टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर प्रक्रिया न करता करणे अधिक श्रेयस्कर - अमृत महाराष्ट्र

टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर प्रक्रिया न करता करणे अधिक श्रेयस्कर

रिसायकलिंगपेक्षा अपसायकलिंग अधिक पर्यावरणस्नेही

टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर प्रक्रिया न करता करणे अधिक श्रेयस्कर मुख्य फोटो
टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर प्रक्रिया न करता करणे अधिक श्रेयस्कर अतिरिक्त फोटो

रिड्यूस, रीयूझ आणि रिसायकल हा 'थ्री-आर'चा मंत्र पर्यावरण रक्षणात महत्त्वाची भूमिका निभावतो. रिड्यूस म्हणजे कोणत्याही गोष्टीचा कमीत कमी म्हणजेच आवश्यकतेएवढाच वापर करणे गरजेचे आहे. त्यातून कचऱ्याची निर्मिती कमी होऊ शकते. रीयूझ म्हणजेच एकदाच वापरून फेकून देण्यासारख्या गोष्टींचा वापर न करता पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या गोष्टींचा आवर्जून वापर करणे, तसेच शक्य त्या त्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा वापर करणे होय. रिसायकल म्हणजे टाकाऊ गोष्टीपासून नवी काही तरी उपयुक्त वस्तू तयार करणे होय. रिसायकल हा पर्याय चांगला असला, तरी त्यापेक्षा अपसायकल म्हणजेच प्रक्रिया न करता पुनर्वापर करणे अधिक श्रेयस्कर ठरते.

एखादी गोष्ट वापरून जुनी झाली, की ती वस्तू एक तर कचऱ्यात फेकली जाते किंवा पर्यावरण संवर्धनाचा हेतू ठेवून रिसायकलिंगसाठी पाठवली जाते. परंतु पर्यावरण विषयाचा बारकाईने अभ्यास करणाऱ्या व्यक्ती आणि पर्यावरणमित्र अशा वस्तू रिसायकलिंगसाठी न पाठवता पुन्हा कशा वापरता येतील याचा विचार करतात. कारण रिसायकलिंग करताना त्यावर पुन्हा अतिरिक्त ऊर्जा खर्च होत असते. ऊर्जा खर्च होणे म्हणजे परत कर्बउत्सर्जन आलेच. त्यापेक्षा चांगला पर्यायी मार्ग म्हणजे पुनर्वापर अर्थात अपसायकल. याचे एक उदाहरण पाहू या.

कपड्यांची शिलाई करताना कापडाचे अनेक छोटे छोटे तुकडे उरतात. या चिंध्या एक तर कचऱ्यात टाकल्या जातात किंवा जाळल्या जातात. म्हणजे पुढे त्यांचा काहीच उपयोग नाही. पर्यावरणाचा विचार करताना कचरा वाढवायचाही नाही आणि जाळायचे तर त्याहून नाही. मग याचे करायचे काय?

या चिंध्याचा खालील प्रकारे पुन्हा चांगला उपयोग करता येईल. 

गाड्या दुरुस्त करणाऱ्या मेकॅनिक्सना इंजिनचे भाग पुसण्यासाठी अशा चिंध्यांचा चांगला उपयोग होतो. घर किंवा ऑफिस सजावटीसाठी सोफ्यावर चौकोनी उशा वापरल्या जातात. अशा उशा बनवण्यासाठीही या चिंध्यांचा उपयोग होऊ शकतो. तसेच, सोबतच्या फोटोत दाखवल्याप्रमाणे चांगले डिझायनर मास्क रोजच्या उपयोगासाठी वापरता येतात. त्यासाठीसुद्धा चिंध्यांचा वापर होऊ शकतो.

त्यामुळे शक्य त्या ठिकाणी अशा अपसायकलिंगचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे.

- शैलेश राईलकर, चौल, अलिबाग

(निसर्ग, पर्यावरण आणि कोकणमित्र)

Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 11:30 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news
Publisher: Shailesh Marathe News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 11:30 PM News publication time | Views: 56 Number of times this news has been viewed | District: raigad Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement