स्थानिक उद्योजकांना नवे व्यासपीठ; ग्राहकांना थेट उत्पादकांकडून खरेदीची सुवर्णसंधी
जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम राबवला जातो. स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच ग्राहकांना थेट उत्पादकांकडून दर्जेदार वस्तूंच्या खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यासाठीचा हा उपक्रम ११ व १२ एप्रिल रोजी जालन्यात होणार आहे.
स्वदेशी बाजारपेठ या संकल्पनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात स्थानिक उद्योजक, महिला बचत गट, तसेच नवउद्योजकांनी तयार केलेल्या विविध उत्पादनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती उत्पादने, हस्तकला वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे तसेच दैनंदिन वापराच्या विविध वस्तूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे नागरिकांना थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक व स्वदेशी उत्पादनांना चालना मिळणार आहे.
स्वदेशी वस्तूंच्या वापराला चालना देण्यासाठी आणि स्थानिक लघुउद्योजकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाला जास्तीत जास्त जणांनी भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृतपेठ थेट बाजारपेठ
दिनांक : ११ व १२ एप्रिल, सकाळी नऊ ते रात्री नऊ
स्थळ : महेश भवन, गुरू बच्चन चौक, मंठा चौफुली, जालना
अधिक माहितीसाठी संपर्क : ७३९१०६५४७४, ९४२१९४४७५२
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment