नाशिकमधील वृत्तपत्र वितरण व्यावसायिकाच्या कन्येने दहावीत मिळवले १०० टक्के गुण

दिंडोरी रोड येथील 'नांदुर्डीकर न्यूजपेपर्स'च्या संचालकांची मुलगी श्रावणी हिचे घवघवीत यश

नाशिकमधील वृत्तपत्र वितरण व्यावसायिकाच्या कन्येने दहावीत मिळवले १०० टक्के गुण मुख्य फोटो
मुख्य फोटो

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आठ मे रोजी जाहीर झाला. त्यात दिंडोरी रोड (नाशिक) येथील श्रावणी नांदुर्डीकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. तिने १०० टक्के गुण मिळवून नाशिक जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नांदुर्डीकर न्यूजपेपरचे संचालक श्री. महेश आणि सौ. तृप्ती नांदुर्डीकर यांची श्रावणी ही कन्या. उल्लेखनीय बाब म्हणजे हे यश श्रावणीने कुठल्याही खासगी क्लासला न जाता मिळवले आहे. या यशाबद्दल श्रावणीसह नांदुर्डीकर परिवार आणि श्रावणीच्या शिक्षकांचे अमृत संस्थेतर्फे अभिनंदन करण्यात आले असून, तिच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 01:31 PM News publication time | Views: 798 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement