अजिंठा डोंगररांगेतील प्राचीन गुहेतील अंबऋषी महादेवाचे मंदिर

पर्यंटनदृष्ट्या महत्त्वाचे असलेले धार्मिक स्थळ

अजिंठा डोंगररांगेतील प्राचीन गुहेतील अंबऋषी महादेवाचे मंदिर  मुख्य फोटो
अजिंठा डोंगररांगेतील प्राचीन गुहेतील अंबऋषी महादेवाचे मंदिर  अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील आमसरी येथे अजिंठा डोंगररांगेत अंबऋषी महादेवाचे प्राचीन गुहा मंदिर आहे. डोंगराच्या कपारीत आणि सुमारे १५० फूट खोल दरीत असलेल्या या मंदिरात स्वयंभू शिवलिंग असून, ते जागृत देवस्थान असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश भागातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिरासमोर सुंदर धबधबा आणि कातळात कोरलेले पाण्याचे कुंड असल्यामुळे हा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे.

मंदिर गुहेमध्ये असल्यामुळे काही पायऱ्या उतरून आत जावे लागते. गुहेत नंदी, पार्वती यांच्या प्राचीन मूर्ती, तसेच शिवलिंग आहे. गुहा आतपर्यंत मोठी असल्याचे सांगितले जाते. मंदिराजवळच महंत कैलासगिरी महाराजांचे समाधीमंदिर आहे. त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केले व वनौषधींच्या मदतीने उपचारही केले होते. त्यांच्या समाधिस्थळी दर वर्षी १४ एप्रिल रोजी हरिनाम सप्ताह भरतो.

भाविकांची श्रद्धा आणि येथे होणाऱ्या गर्दीमुळे राज्य शासनाने या परिसराला तीर्थक्षेत्राचा ‘क’ दर्जा दिला आहे. हे ठिकाण सिल्लोडपासून सुमारे ३७ किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगरपासून १०१ किलोमीटर अंतरावर असून, एसटी व खासगी वाहनाने येथे जाता येते.

Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 04:03 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 26-05-2026 News publication date | Time: 04:03 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement