१०२ व्या गणेशोत्सवानिमित्त ‘एक वही, एक पेन’ उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांच्या वतीने यंदाच्या १०२ व्या गणेशोत्सवानिमित्त “एक वही, एक पेन” हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे.
डोंबिवली ही केवळ निवासी व औद्योगिक नगरी नसून, कला, साहित्य, संगीत, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखली जाते.

१०२ व्या गणेशोत्सवानिमित्त ‘एक वही, एक पेन’ उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुख्य फोटो
१०२ व्या गणेशोत्सवानिमित्त ‘एक वही, एक पेन’ उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अतिरिक्त फोटो

श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंदिर संस्थान, डोंबिवली यांच्या वतीने यंदाच्या १०२ व्या गणेशोत्सवानिमित्त “एक वही, एक पेन” हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे.

डोंबिवली ही केवळ निवासी व औद्योगिक नगरी नसून, कला, साहित्य, संगीत, शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखली जाते.

एक वही, एक पेन” हा उपक्रम डोंबिवलीच्या याच सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचे उदाहरण आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करणे, ज्ञानदानाचा संदेश देणे आणि नागरिकांना सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे, ही शहराच्या समृद्ध नागरी संस्कृतीची सकारात्मक बाजू आहे.

बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाच्या चरणी पाने-फुले ,दक्षिणा अर्पण करण्याऐवजी एक वही आणि एक पेन अर्पण करून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावावा असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाला डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून , अनेक भक्त, नागरिक आणि गणेशभक्त या ज्ञानदानाच्या उपक्रमात सहभागी होत आहेत. गणरायाच्या चरणी अर्पण केलेली ही शैक्षणिक साधने गरजू विद्यार्थ्यांच्या हातात पोहोचवून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा संस्थानाचा मानस आहे.

या उपक्रमाची माहिती आपल्या आप्तेष्ट, कुटुंबीय, मित्रमंडळी, विद्यार्थी, सोसायटीतील रहिवासी आणि परिचितांपर्यंत पोहोचवावी. तसेच डोंबिवलीतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही या ज्ञानदानाच्या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Publisher: माया रत्नपारखी- खेत्रे News publisher name | Date: 16-09-2026 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 32 Number of times this news has been viewed | District: Thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement