सोलापूर जिल्हा: 'अमृत' संस्थेच्या व्याज परतावा योजनेतून बारशीत साकारला रोजगाराचा नवा मार्ग!

सोलापूर जिल्हा: 'अमृत' संस्थेच्या व्याज परतावा योजनेतून बारशीत साकारला रोजगाराचा नवा मार्ग!

सोलापूर जिल्हा: 'अमृत' संस्थेच्या व्याज परतावा योजनेतून बारशीत साकारला रोजगाराचा नवा मार्ग! मुख्य फोटो
सोलापूर जिल्हा: 'अमृत' संस्थेच्या व्याज परतावा योजनेतून बारशीत साकारला रोजगाराचा नवा मार्ग! अतिरिक्त फोटो

सोलापूर: महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या संस्थेच्या 'वैयक्तिक व्याज परतावा' योजनेच्या माध्यमातून बारशी येथील तरुण व्यावसायिक सुनील मधुकर शेट्टे यांनी स्वतःच्या पायावर उभे राहत उद्योजकतेचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. 'अमृत'च्या आर्थिक पाठबळामुळे त्यांनी बारशी येथे 'सुनील झेरॉक्स' नावाने व्यवसाय सुरू केला असून,आज हा उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहे.

​सुनील शेट्टे यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा होती, मात्र भांडवलाची अडचण भासत होती. अशा वेळी 'अमृत' संस्थेच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेची माहिती मिळताच त्यांनी अर्ज केला. योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या आर्थिक सहाय्यामुळे त्यांनी झेरॉक्स व अ‍ॅटोमोबाईल सेंटर उभारले. उत्तम सेवा आणि कष्ट याच्या जोरावर त्यांचा व्यवसाय अल्पावधीत नावारूपाला आला.

​आपल्या यशाबद्दल बोलताना सुनील शेट्टे यांनी सांगितेल, "अमृत संस्थेच्या योजनेमुळे माझ्या स्वप्नांना पंख मिळाले. वेळेवर मिळालेले पाठबळ आणि व्याज परतावा योजनेचा मोठा दिलासा यामुळेच मी आज एक यशस्वी व्यावसायिक बनू शकलो. याबद्दल मी 'अमृत' संस्थेचे मनःपूर्वक आभार मानतो."

अमृत कार्यालय, १०८ A, श्री साई बिल्डिंग, तिसरा मजला, यतीराज हॉटेलजवळ, सात रस्ता, सोलापूर - ४१३००१ 📞 अमृत कार्यालय: 9112228768


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 19-09-2026 News publication date | Time: 10:46 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news
Publisher: ARYA KULKARNI News publisher name | Date: 19-09-2026 News publication date | Time: 10:46 AM News publication time | Views: 50 Number of times this news has been viewed | District: Solapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement