यवतमाळ येथे नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षक भरती प्रक्रियेत अमृतच्या लक्षित गटातील विक्रांत सत्यनारायण शर्मा यांची जिल्हा परिषद, पुणे येथे कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या नव्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली असून, त्यांच्या या यशाबद्दल अमृत जिल्हा कार्यालय यवतमाळतर्फे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

विशेष म्हणजे विक्रांत शर्मा यांची शिक्षकपदी नियुक्ती EWS (आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक) प्रवर्गातून झाली आहे. त्यांच्या या यशामुळे समाजातील विद्यार्थी व युवकांसमोर उपलब्ध शासकीय संधींचा योग्य पद्धतीने लाभ घेण्याचे उदाहरण निर्माण झाले आहे.
आपल्या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना विक्रांत शर्मा म्हणाले, “आपल्या समाजातील मुलांनी EWS प्रवर्गासह उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना व सवलतींची माहिती घेऊन त्यांचा अधिकाधिक लाभ घेतला पाहिजे. अनेक पात्र विद्यार्थी माहितीअभावी अशा संधींपासून वंचित राहतात, ही खंत आहे.”
समाजातील युवकांनी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, रोजगार व विविध शासकीय योजनांचा अभ्यास करून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. विक्रांत शर्मा यांच्या या यशाबद्दल अमृत जिल्हा कार्यालयचे पदाधिकारी, युवा ब्राह्मण संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment