परंड्यात २४ सप्टेंबर रोजी ‘अमृत पेठ’ व महा आरोग्य शिबिर अमृत व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

परंडा : महिला सक्षमीकरण, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ आणि महा आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

परंड्यात २४ सप्टेंबर रोजी ‘अमृत पेठ’ व महा आरोग्य शिबिर  अमृत व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन मुख्य फोटो
परंड्यात २४ सप्टेंबर रोजी ‘अमृत पेठ’ व महा आरोग्य शिबिर  अमृत व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन अतिरिक्त फोटो

परंडा : महिला सक्षमीकरण, स्थानिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ आणि महा आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ या उपक्रमामध्ये महिला बचत गट, गृहउद्योग व महिला उद्योजिकांनी तयार केलेल्या विविध वस्तू, हस्तकला, खाद्यपदार्थ, वस्त्रप्रकार, दागिने, सजावटीच्या वस्तू व इतर स्थानिक उत्पादनांच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा उपक्रम सकाळी ११ वाजता सुरू होणार असून सहभागी महिला बचत गट व उद्योजिकांना स्टॉल पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

याच दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या महा आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरात हृदयरोग, नेत्ररोग, बालरोग, स्त्रीरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग तसेच पोटाचे विकार आदींसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. हे शिबिर तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नेरुळ (नवी मुंबई) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.

विशेष बाब म्हणजे शिबिरादरम्यान पात्र नागरिकांची आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कार्ड नोंदणी व कार्ड काढून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

महिला बचत गट, उद्योजिका, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या दोन्ही उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, धाराशिव व समर्थ तरुण गणेश मंडळ, परंडा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : समर्थ तरुण गणेश मंडळ, सोमवार गल्ली, परंडा, जि. धाराशिव. वेबसाईट : www.mahaamrut.org.in संपर्क : अमृत पेठ – ९९७०५३८९६०, ९८३४१६७४२७, ७०५७३३५२३२, ७९७२६८३०३१, ९०७५४७८४९२, ९३०७५२३०८१ आरोग्य शिबिर – ८६५७९५९७८०, ७०२८४१५६४२, ९३२५९३७३४२, ९०११६७४३३४.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

 

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 05:31 PM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news
Publisher: Chinmay Kulkarni News publisher name | Date: 23-09-2026 News publication date | Time: 05:31 PM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: Dharashiv Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement