अकोल्याच्या ओम अग्रवाल यांना 'आयआयटी-कानपूर'मध्ये प्रवेश - अमृत महाराष्ट्र

अकोल्याच्या ओम अग्रवाल यांना 'आयआयटी-कानपूर'मध्ये प्रवेश

मेहनत आणि चिकाटीला मिळाली अमृत संस्थेच्या अर्थसाह्याची जोड

अकोल्याच्या ओम अग्रवाल यांना 'आयआयटी-कानपूर'मध्ये प्रवेश मुख्य फोटो
अकोल्याच्या ओम अग्रवाल यांना 'आयआयटी-कानपूर'मध्ये प्रवेश अतिरिक्त फोटो

अकोला : अकोला जिल्ह्यातील ओम अग्रवाल यांनी आपली मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर कानपूर येथील आयआयटी या नामवंत शिक्षणसंस्थेमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान वाढला आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सर्वसामान्य असूनही त्यांनी मोठी स्वप्ने पाहिली आणि जिद्दीने ती पूर्ण केली. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था या वाटचालीत ओम यांच्याबरोबर आहे. 

ओम यांचा शैक्षणिक प्रवास हे संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वास यांचे उत्तम उदाहरण आहे. कठोर परिश्रम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर त्यांनी देशातील अग्रगण्य तंत्रशिक्षण संस्थेत प्रवेश मिळवला. त्यांच्या या यशामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे. त्यांच्या उच्च शिक्षणासाठी अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत आर्थिक साह्य मिळाले आहे. या साह्याचा पहिला टप्पा म्हणून ६० हजार रुपये त्यांच्या बँकखात्यात जमा झाले. या आर्थिक मदतीमुळे त्यांना शिक्षणाचा खर्च उचलणे सुलभ झाले असून, त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला मोठी गती मिळाली आहे. योग्य वेळी मिळालेली ही मदत त्यांच्या स्वप्नांना पंख देणारी ठरली आहे.

ओम अग्रवाल यांचे हे यश संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची मेहनत आणि शासनाच्या योजनेमुळे मिळालेली साथ यामुळेच आज ते उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत. उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 01:33 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 16-02-2026 News publication date | Time: 01:33 PM News publication time | Views: 52 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement