संत जगमित्र नागा यांचा अभंग
अग्नि जाळी तरी न जळे प्रल्हादु ।
हृदयी गोविंदु म्हणोनिया ।।१।।
अग्नि जाळी तरी न जळती गोपाळू ।
हृदयी देवकीबाळू ह्मणोनिया ।।२।।
अग्नि जाळी तरी न जळती पांडव ।
हृदयी वासुदेव ह्मणोनियां ।।३।।
लंकेसी उरले बिभीषणाचें घर ।
हृदयी सीतावर ह्मणोनियां ।।४।।
अग्नि जाळी तरी न जळे जगमित्र नागा ।
हृदयीं वनमाळी ह्मणोनियां ।।५।।
- संत जगमित्र नागा
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment