नांदेडमधील नंदनवन नेरली लोकसेवा मंडळाला अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट - अमृत महाराष्ट्र

नांदेडमधील नंदनवन नेरली लोकसेवा मंडळाला अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट

मतिमंद आणि कुष्ठरोगी बांधवांच्या कलेला देण्यात आली दाद

नांदेडमधील नंदनवन नेरली लोकसेवा मंडळाला अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट मुख्य फोटो
नांदेडमधील नंदनवन नेरली लोकसेवा मंडळाला अमृत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भेट अतिरिक्त फोटो

नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड जिल्हा कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नुकतीच नंदनवन नेरली लोकसेवा मंडळाला भेट दिली. तेथील मतिमंद व कुष्ठरोगी बांधवांची भेट घेऊन त्यांची कला पाहण्याचा अनुभव सुंदर होता, अशी भावना अमृत संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली. या वेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी, उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, अमृतसखी मनीषा कुनसावळीकर, संजना कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नंदनवन नेरली लोकसेवा मंडळातील मतिमंद व कुष्ठरोगी बांधवांनी अत्यंत मनापासून व मेहनतीने विविध हस्तकला वस्तू तयार केल्या आहेत. त्यांनी बनवलेली कापडी फुले, दिवाळीचे दिवे, सतरंज्या, तसेच इतर अनेक आकर्षक व उपयुक्त वस्तू अमृतपेठ थेट बाजारपेठेमध्ये मांडण्यात आल्या होत्या. या सर्व वस्तू त्यांनी स्वतःच्या हातांनी अत्यंत कौशल्याने व नीटनेटकेपणाने तयार केलेल्या आहेत. प्रत्येक वस्तू पाहताना त्यांची मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास स्पष्टपणे दिसून येतो. त्यांच्या या कलाकुसरीला प्रोत्साहन देणे आणि अशा वस्तू खरेदी करून त्यांना आधार देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेने अमृत संस्थेतर्फे ही भेट देण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 03:44 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 24-03-2026 News publication date | Time: 03:44 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement