अमृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन नांदेडमधील आशिष पांडे झाले ड्रोन पायलट - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन नांदेडमधील आशिष पांडे झाले ड्रोन पायलट

उद्योजक बनण्याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण महत्त्वाचे असल्याची भावना पांडे यांच्याकडून व्यक्त

अमृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन नांदेडमधील आशिष पांडे झाले ड्रोन पायलट मुख्य फोटो
अमृत संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन नांदेडमधील आशिष पांडे झाले ड्रोन पायलट अतिरिक्त फोटो

नांदेड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षणवर्गाचाही समावेश आहे. नांदेड येथील आशिष पांडे यांनी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले १० दिवसांचे ड्रोन पायलट प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले.

या प्रशिक्षणामधून मिळालेला अनुभव अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरल्याचे आशिष पांडे यांनी सांगितले. प्रशिक्षणात थिअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही प्रकारचे सखोल व प्रभावी मार्गदर्शन मिळाल्यामुळे ड्रोन तंत्रज्ञानाची उत्तम माहिती प्राप्त झाल्याचे ते म्हणाले. तसेच, हे प्रशिक्षण व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजक बनण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. या वेळी त्यांनी अमृत संस्थेचे, तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. अमृत संस्थेचे ओंकार शेटे, सौरभ कुलकर्णी, विश्वेश्वर जोशी आणि मनीषा मॅडम यांचे त्यांनी विशेष आभार मानले.

अमृत संस्थेमार्फत अशा प्रकारचे कौशल्यविकास प्रशिक्षण उपक्रम राबवले जात असून, त्यामुळे युवकांना रोजगार व उद्योजकतेच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 26-03-2026 News publication date | Time: 12:25 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news
Publisher: श्री सौरभ संतोष कुलकर्णी News publisher name | Date: 26-03-2026 News publication date | Time: 12:25 PM News publication time | Views: 86 Number of times this news has been viewed | District: nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement