डोंबिवलीत चार एप्रिलला शासकीय दाखल्यांच्या मोफत वितरणाचे शिबिर - अमृत महाराष्ट्र

डोंबिवलीत चार एप्रिलला शासकीय दाखल्यांच्या मोफत वितरणाचे शिबिर

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आयोजन

डोंबिवलीत चार एप्रिलला शासकीय दाखल्यांच्या मोफत वितरणाचे शिबिर मुख्य फोटो
मुख्य फोटो

डोंबिवली : शासकीय योजनांचा लाभ घेण्याठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात. हे शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळावेत, या हेतूने अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या डोंबिवली शहर शाखेने कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या सहकार्याने चार एप्रिलला डोंबिवली शहरात शासकीय दाखल्यांचे मोफत वाटप करण्याचे शिबीर आयोजित केले आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवते. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले विविध दाखलेही या शिबिरात मिळू शकणार आहेत. या शिबिरामुळे नागरिकांना शासकीय कागदपत्रे मिळविण्यासाठी लागणारा वेळ, खर्च आणि त्रास कमी होणार असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून, शिबिरात मिळणार असलेले दाखले आणि अन्य माहिती खाली दिली आहे. आवश्यक कागदपत्रे मूळ स्वरूपात लागतील आणि झेरॉक्स प्रतीही सादर कराव्या लागणार आहेत.

- ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र (खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक)

आवश्यक कागदपत्रे : मुलाच्या शाळेचा दाखला, वडिलांचा उत्पन्न दाखला, डोमिसाइल, जन्मदाखला, आधारकार्ड, वडिलांचा शाळेचा दाखला, आधार, पॅन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, मुलाचे आणि वडिलांचे फोटो

- अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र

आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज, शिधापत्रिका झेरॉक्स, जन्मदाखला, शाळेचा दाखला, आधारकार्ड

- आयुष्मान भारत कार्ड

आवश्यक कागदपत्रे : शिधापत्रिका झेरॉक्स, आधारकार्ड (आधार लिंक मोबाइल सोबत असावा.)

- ज्येष्ठ नागरिक दाखला

आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, शिधापत्रिका झेरॉक्स, दोन फोटो, वयाचा पुरावा.

- उत्पन्नाचा दाखला

आवश्यक कागदपत्रे : विहित नमुन्यातील अर्ज, आधार, पॅनकार्ड, तीन महिन्यांचे वीजबिल, बँक पासबुक पहिले पान, तीन महिन्यांच्या पासबुक एंट्रीज, घराची टॅक्स/मेन्टेनन्स पावती, तीन महिन्यांची पगार पावती किंवा फॉर्म १६/IVTR, दोन फोटो

- श्रम कल्याण कार्ड

आवश्यक कागदपत्रे : शिधापत्रिका झेरॉक्स, आधार कार्ड (आधार लिंक मोबाइल सोबत असावा.)

मोफत शासकीय दाखले वितरण शिबिर

दिनांक : शनिवार, ४ एप्रिल २०२६

वेळ : सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३०

स्थळ : साई शुभ कार्यालय, श्रीखंडवाडी, डोंबिवली (पूर्व)

अधिक माहितीसाठी संपर्क :

शशांक खेर : 72085 19251

शरद तळवलकर : 98191 21700

दीपक भिडे : 90829 65101

विवेक भोळे : 98191 21700

सुबोध पाटील : 99209 78516

शैलजा वैद्य : 92220 42711

विद्या इनामदार : 86929 99011

पल्लवी जोशी : 98691 93178

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 07:15 PM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 28-03-2026 News publication date | Time: 07:15 PM News publication time | Views: 20 Number of times this news has been viewed | District: thane Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement