टायपिंग परीक्षा उत्तीर्ण व्हा आणि फी परत मिळवा! अमृत संस्थेची योजना

ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांना घेता येईल लाभ

टायपिंग परीक्षा उत्तीर्ण व्हा आणि फी परत मिळवा! अमृत संस्थेची योजना मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी व कौशल्यविकासाच्या योजना राबवते. त्याचाच एक भाग म्हणून गव्हर्न्मेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स (जीसीसी टीबीसी) करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्थसाह्य केले जाते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षेत (जीसीसी टीबीसी) उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना कोर्सच्या फीच्या रकमेचा परतावा मिळतो. ही रक्कम ६५०० रुपये एवढी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगारक्षम होण्यासाठी आवश्यक कौशल्य प्राप्त होते आणि त्यासाठी खर्च झालेले पैसेही परत मिळतात. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख, स्वयंरोजगारक्षम व रोजगारक्षम बनवणे हाच या योजनेचा हेतू आहे.

कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

कार्यालय कुठे? अर्ज कसा करायचा?

पुण्यात औंधमध्ये अमृत संस्थेचे मुख्यालय आहे. तसेच, अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज पेपरलेस आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट वेबसाइटवर अर्ज करावा लागतो. अधिक माहिती आणि साह्य आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून मिळू शकते.

संपूर्ण माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी लिंक :

या योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच योजनेसाठी अर्ज करता येतो. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/168

अधिक माहितीसाठी

अमृत संस्था मुख्यालय : पाचवा मजला, अमृत इमारत, भीमसेन जोशी सभागृहाजवळ, वॉर्ड क्र. ८, पीएमआरडीए, औंध, पुणे - ४११०६७

ई-मेल : info@mahaamrut.org.in

मोबाइल : 9730151450

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुभव वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


(निवडक शासकीय योजनांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)




Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-04-2026 News publication date | Time: 11:27 AM News publication time | Views: 2,516 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 27-04-2026 News publication date | Time: 11:27 AM News publication time | Views: 2,516 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement