घाटंजी येथे माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा

आर्यवैश्य समाजातर्फे आयोजन; अमृत संस्थेच्या योजनांची देण्यात आली माहिती

घाटंजी येथे माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा मुख्य फोटो
घाटंजी येथे माता कन्यका परमेश्वरी जन्मोत्सव उत्साहात साजरा अतिरिक्त फोटो

घाटंजी (जि. यवतमाळ) : आर्य वैश्य समाजातर्फे माता कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव घाटंजी येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता कन्यका परमेश्वरी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. समाजाचे अध्यक्ष मनोजभाऊ उत्तरवार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

अमृत संस्थेचे यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक परीक्षित शर्मा या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी समाजबांधवांना अमृत संस्थेच्या विविध योजनांबाबत या वेळी सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांमधील कला-कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आरती ताट सजावट आणि फ्लॉवर डेकोरेशन या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरती ताट सजावट स्पर्धेत सौ. स्वाती बुक्कावार यांना प्रथम, सौ. अनुश्री भांडारवार यांना द्वितीय, तर सौ. प्रीती अंजीकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धेत सौ. स्मिता नार्लावार यांनी प्रथम, सौ. स्वप्नाली भास्करवार यांनी द्वितीय आणि सौ. सोनाली चिंतावार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. सर्व विजेत्यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आर्य वैश्य समाजाच्या पुरुष व महिला कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.

अधिक माहितीसाठी संपर्क :

परीक्षित कमलकिशोर शर्मा - ९११२२२७६३३, ८०८७२४८६७४

यवतमाळ जिल्हा व्यवस्थापक, अमृत

जिल्हा कार्यालय पत्ता : 

स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, 

फ्लॅट क्रमांक ए-१, 

अवधूतवाडी, तिवारी चौक, 

यवतमाळ - ४४५ ००१  

ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/



Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 27-04-2026 News publication date | Time: 11:52 AM News publication time | Views: 613 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news
Publisher: Parikshit Sharma News publisher name | Date: 27-04-2026 News publication date | Time: 11:52 AM News publication time | Views: 613 Number of times this news has been viewed | District: Yavatmal Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement