MPSC, UPSC ची तयारी करताय? अमृत संस्था देते प्रोत्साहनात्मक अर्थसाह्य

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी, युवक-युवती घेऊ शकतात लाभ

MPSC, UPSC ची तयारी करताय? अमृत संस्था देते प्रोत्साहनात्मक अर्थसाह्य मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. ही संस्था विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील अधिकाधिक विद्यार्थी, युवक आणि युवतींनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC), तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यशस्वी व्हावे, त्यांचा प्रशासनातील सहभाग वाढावा, याकरिता अमृत संस्थेतर्फे प्रोत्साहनपर अर्थसाह्य केले जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळतो.

प्रति लाभार्थी प्रोत्साहनात्मक अर्थसाह्य नेमके किती?

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी ५० हजार रुपये

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी २५ हजार रुपये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी १५ हजार रुपये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रक्कम १० हजार रुपये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी १० हजार रुपये

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित सेवा मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी पाच हजार रुपये

हे प्रोत्साहनात्मक अर्थसाह्य पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना खालील परीक्षांसाठी लागू असेल. 

यूपीएससी

१. नागरी सेवा पूर्वपरीक्षा

२. नागरी सेवा मुख्य परीक्षा

३. वनसेवा पूर्व परीक्षा

४. वनसेवा मुख्य परीक्षा

५. अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा

६. अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

एमपीएससी

१. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा

२. राज्य सेवा मुख्य परीक्षा

३. कृषी सेवा मुख्य परीक्षा

४. वन सेवा मुख्य परीक्षा

५. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

६. दिवाणी न्यायाधीश पूर्वपरीक्षा

७. दिवाणी न्यायाधीश मुख्य परीक्षा

८. अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा

९. अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा

१०. अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा

११. निरीक्षक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा

१२. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

१३. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

१४. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

कार्यालय कुठे? अर्ज कसा करायचा?

पुण्यात औंधमध्ये अमृत संस्थेचे मुख्यालय आहे. तसेच, अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज पेपरलेस आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट वेबसाइटवर अर्ज करावा लागतो. अधिक माहिती आणि साह्य आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून मिळू शकते.


संपूर्ण माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी लिंक :

या योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे. तसेच, आवश्यक कागदपत्रांचीही माहिती तिथेच दिलेली आहे. त्या लिंकवरूनच योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा लागतो. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/72

अधिक माहिती किंवा साह्य अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयात मिळू शकते. तसेच मुख्यालयाशी संपर्काचा तपशील खाली दिला आहे.

अमृत संस्था मुख्यालय : पाचवा मजला, अमृत इमारत, भीमसेन जोशी सभागृहाजवळ, वॉर्ड क्र. ८, पीएमआरडीए, औंध, पुणे - ४११०६७

ई-मेल : info@mahaamrut.org.in

मोबाइल : 9730151450

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुभव वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


(निवडक शासकीय योजनांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)



Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 01:49 PM News publication time | Views: 1,807 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 01:49 PM News publication time | Views: 1,807 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement