ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांसाठी अमृत संस्थेचा प्रशिक्षण उपक्रम
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक सहकार्य करणे, यावर अमृत संस्थेचा भर आहे. या उद्देशाने विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण उपक्रम अमृत संस्थेतर्फे राबवले जातात. त्यापैकीच एक महत्त्वाचा प्रशिक्षण उपक्रम म्हणजे अमृत सूर्यमित्र. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अर्थात 'एमसीईडी'च्या सहकार्याने हा उपक्रम राबवला जातो. हा जवळपास १८ दिवसांचा निवासी आणि प्रोफेशनल कोर्स असतो आणि पूर्णतः निःशुल्क असतो. यामध्ये थिअरीबरोबरच प्रॅक्टिकलवर अधिक भर असतो. त्यामुळे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना सौर पॅनेल इंस्टॉलेशन टेक्निशियन म्हणून स्वतःचा छोटा उद्योग सुरू करता येऊ शकतो.
पीएम सूर्यघर योजना सुरू झाल्यापासून घरांवर सौरऊर्जानिर्मिती युनिट्स बसवण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी गरज निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर खुल्या प्रवर्गातील गरजू आणि पात्र उमेदवारांनी हे प्रशिक्षण घेतल्यास त्याचा खूप मोठा उपयोग होऊ शकतो.
कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.
कार्यालय कुठे? अर्ज कसा करायचा?
पुण्यात औंधमध्ये अमृत संस्थेचे मुख्यालय आहे. तसेच, अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज पेपरलेस आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट वेबसाइटवर अर्ज करावा लागतो. अधिक माहिती आणि साह्य आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून मिळू शकते.
संपूर्ण माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी लिंक :
या योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध आहे. तसेच, आवश्यक कागदपत्रांचीही माहिती तिथेच दिलेली आहे. त्या लिंकवरूनच योजनेच्या लाभासाठी अर्ज करावा लागतो. वेबसाइटवरील माहिती वेळोवेळी अपडेट होत असते. तेथील माहितीच अंतिम समजावी. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/264
अधिक माहिती किंवा साह्य अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयात मिळू शकते. तसेच मुख्यालयाशी संपर्काचा तपशील खाली दिला आहे.
अमृत संस्था मुख्यालय : पाचवा मजला, अमृत इमारत, भीमसेन जोशी सभागृहाजवळ, वॉर्ड क्र. ८, पीएमआरडीए, औंध, पुणे - ४११०६७
ई-मेल : info@mahaamrut.org.in
मोबाइल : 9730151450
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment