अमृत संस्थेच्या योजनांच्या माहितीने अनेक जण झाले प्रभावित

अमृत परिवार सर्वेक्षणातील नोंदी - नागपूर शहर

अमृत संस्थेच्या योजनांच्या माहितीने अनेक जण झाले प्रभावित मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील काही अनुभव....

अमृत संस्थेतर्फे परिवार सर्वेक्षण आठ एप्रिल २०२६पासून सुरू झाले. माझ्याकडे नागपूर शहराची जबाबदारी देण्यात आली होती. प्रथम रामटेकला जाऊन श्रीरामाचे दर्शन घेऊन या कार्याचा शुभारंभ केला. त्यामुळे चांगले यश मिळाले. मी संघाचा स्वयंसेवक असल्याने परिचित माननीय व्यक्तींची भेट घेतली आणि त्यांना अमृतमित्र म्हणून खुल्या प्रवर्गातील मुलांना अमृत संस्थेच्या विविध योजना आणि दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची माहिती दिली. त्यामुळे ते प्रभावित झाले आणि त्यांनी मदतीचे आश्वासन दिले. त्या आधारे मी परिवार सर्वेक्षणाला सुरुवात केली. या कामाला काही दिवसांतच उत्तम प्रतिसाद लाभला. अल्पावधीत अनेक परिवार संपर्कात आले आणि त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. एकंदरीत ४५० ते ५०० परिवार या कालावधीत संपर्कात आले. 


- रवींद्र श्रौती

अमृतमित्र

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 01:24 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 06-05-2026 News publication date | Time: 01:24 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement