अमृत परिवार सर्वेक्षण अभियान - नागपूर

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचीही नोंदणी

अमृत परिवार सर्वेक्षण अभियान - नागपूर मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील काही अनुभव....

अमृत परिवार सर्वेक्षण अभियान आठ एप्रिल २०२६पासून सुरू झाले. या अभियानांतर्गत विविध घटकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजनांची माहिती पोहोचवण्याचे कार्य करण्यात आले. मी आमच्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अमृत संस्थेच्या योजनांविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) केली. तसेच माझ्या परिचयातील व्यक्तींनाही या संस्थेच्या विविध योजनांची माहिती समजावून सांगून त्यांना सहभागी करून घेतले. त्यांचीही नोंदणी करण्यात आली. या माध्यमातून अमृत परिवार सर्वेक्षण अभियान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. योजनांबद्दल सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अमृत परिवार सर्वेक्षण अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले असून, भविष्यात अधिकाधिक कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले जातील.

नितू वसाडकर

अमृतसखी, नागपूर

Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 05-05-2026 News publication date | Time: 01:37 PM News publication time | Views: 384 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Harshal Gadre News publisher name | Date: 05-05-2026 News publication date | Time: 01:37 PM News publication time | Views: 384 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement