अमृत परिवार सर्वेक्षणातून समोर आले संघर्ष, आशा आणि माणुसकीचे जिवंत चित्र

धुळे जिल्ह्यातील अनुभवांच्या नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षणातून समोर आले संघर्ष, आशा आणि माणुसकीचे जिवंत चित्र मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील काही अनुभव....

अमृत परिवार सर्वेक्षण मोहिमेत समाजातील अनेक कुटुंबांचे जीवन जवळून अनुभवण्याची संधी मिळली. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधताना त्यांच्या संघर्षाची, स्वप्नांची आणि परिस्थितीशी सुरू असलेल्या लढ्याची हृदयस्पर्शी बाजू समोर आली. काही ठिकाणी शिक्षणासाठी धडपडणारे विद्यार्थी भेटले, तर काही कुटुंबांनी रोजगाराच्या अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणी व्यक्त केल्या. अनेक वृद्ध नागरिकांनी शासकीय योजनांची माहिती वेळेवर मिळत नसल्याची व्यथा मांडली. महिलांनी स्वावलंबनासाठी प्रशिक्षण व रोजगाराच्या संधींची अपेक्षा व्यक्त केली.

अमृत परिवार सर्वेक्षण करताना प्रत्येक घरामागची संघर्षमय कहाणी समोर आली. काही कुटुंबांची परिस्थिती पाहून मन भावूक झाले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या गरजा समजून घेणे हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. सर्वेक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नसून, लोकांच्या वेदना आणि आशा जाणून घेण्याचा एक मानवी प्रयत्न आहे. अनेक कुटुंबांनी अत्यंत विश्वासाने आपल्या समस्या आमच्यासमोर मांडल्या. काही वृद्धांच्या डोळ्यातील अश्रू आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठीची धडपड पाहून मन हेलावून गेले. समाजासाठी काम करण्याची प्रेरणा या सर्वेक्षणातून अधिक बळकट होत गेली. अमृत संस्थेचा आधार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.

या सर्वेक्षण मोहिमेमुळे समाजातील सत्य परिस्थिती समजून घेण्यास मदत होत असून, भविष्यात अधिक परिणामकारक सामाजिक व कौशल्यविकास उपक्रम राबवण्यासाठी दिशा मिळत आहे. माझ्यासह अमृतमित्र विलास चंद्रात्रे, अमृतसखी वैशाली कुलकर्णी यांनी सहभाग घेऊन हे परिवार सर्वेक्षण पूर्ण केले. हे सर्वेक्षण फक्त एका महिन्यापुरते मर्यादित न ठेवता नियमितपणे चालू ठेवण्याचा धुळे टीमचा मानस आहे.

हेमंत पाठक 

धुळे जिल्हा व्यवस्थापक, अमृत

Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 11:05 AM News publication time | Views: 393 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 11:05 AM News publication time | Views: 393 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement