अमरावतीतील काही नोंदी...
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अमरावतीतील काही नोंदी...
अमृत परिवार सर्वेक्षणात अमरावती महानगरपालिका क्षेत्रात लक्ष्यित गटांतील विविध घटकांशी संवाद साधताना अनेक प्रेरणादायी अनुभव आले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी, गरजा व अपेक्षा जाणून घेण्यास मदत झाली.
काही महिलांनी सांगितले, की शासनाच्या योजनांची अमृत संस्थेप्रमाणे योग्य माहिती मिळाल्यास स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्याची त्यांची तयारी आहे. युवकांनी रोजगार, कौशल्यविकास व स्वयंरोजगार प्रशिक्षणाबाबत उत्सुकता दर्शवली. अनेक विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा व शिष्यवृत्ती योजनांविषयी माहितीची आवश्यकता व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या सुविधा सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्याची अपेक्षा व्यक्त केली, तर काही कुटुंबांनी 'अमृत'च्या माध्यमातून प्रथमच विविध सरकारी योजनांची सविस्तर माहिती घरबसल्या मिळाल्याचे सांगितले. नागरिकांनी अमृत संस्थेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यातही अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत मांडले.
या सर्व अनुभवांमधून सामाजिक प्रबोधन झाले, आत्मविश्वासात वाढ झाली आणि शासकीय योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यामध्ये 'अमृत'चे कार्य महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे दिसून आले.
- साक्षी कुळकर्णी
अमृतसखी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment