अमृत परिवार सर्वेक्षणामुळे समाजाशी थेट संवाद साधण्याची संधी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षणामुळे समाजाशी थेट संवाद साधण्याची संधी मुख्य फोटो
अमृत परिवार सर्वेक्षणामुळे समाजाशी थेट संवाद साधण्याची संधी अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही नोंदी...

अमृत परिवार सर्वेक्षणामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या संपूर्ण जिल्हा टीमने सक्रिय सहभाग घेऊन समाजातील विविध घटकांशी संवाद साधला. सर्वेक्षण कालावधीत संघ परिवारातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेण्यात आल्या. या भेटींमधून समाजातील विविध प्रश्न, गरजा आणि अपेक्षा जाणून घेण्यास मदत झाली. ग्रामीण भागात सर्वेक्षण करतेवेळी ग्रामपंचायत कार्यालयांमध्येही योजनांची माहिती देऊन स्टिकर्स लावण्यात आले.

ब्राह्मण महिला मंचतर्फे आयोजित भगवान परशुराम याग कार्यक्रमामध्ये अमृत परिवार सर्वेक्षण आणि विविध योजनांची माहिती देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली. अनेकांनी या योजनांविषयी उत्सुकता दाखवून सकारात्मक प्रतिसाद दिला. काही नागरिकांनी शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि आर्थिक मदतीसंदर्भातील अडचणीही मांडल्या. सध्या सुरू असलेल्या योजनांचा लाभ नागरिकांना होत असल्याचेही या वेळी लक्षात आले.

सर्वेक्षण कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची माहिती घेण्याची संधी मिळाली. पैठण तालुक्यातील विहामांडवा परिसरातील हिवरा चौंडाळा येथील रेणुकामातेचे हेमाडपंती मंदिर, आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ, रत्नापूर येथील संत जनार्दन स्वामी यांचे ध्यानमंदिर, सुलीभंजन तसेच पैठण येथील नागघाट येथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले त्या पवित्र स्थळाची माहिती जाणून घेता आली.

एकंदरीतच, या संपूर्ण उपक्रमामुळे समाजाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळाली असून, समाजातील विविध स्तरांतील लोकांपर्यंत अमृत संस्थेच्या योजना पोहोचवण्यास मदत झाली.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

संपर्क : 7391065475

............

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, 

हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

छत्रपती संभाजीनगर - ४३१००९

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 07:26 AM News publication time | Views: 830 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 09-05-2026 News publication date | Time: 07:26 AM News publication time | Views: 830 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement