मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आयोजन; तातडीने अर्ज करण्याचे आवाहन
बौद्ध धर्मातील चार सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक असलेले जगप्रसिद्ध बौद्ध तीर्थक्षेत्र म्हणजे बोधगया. बिहार राज्यातील या पवित्र ठिकाणाला भेट देऊन दर्शन घेण्याची संधी महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत या वर्षी या ठिकाणाची निवड करण्यात आली असून, जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी अर्ज करण्याकरिता २० मे २०२६ ही अंतिम मुदत आहे.
तीन जून ते नऊ जून २०२६ या कालावधीत या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत पात्र व्यक्तीला एका यात्रेकरिता योजनेचा एकदा लाभ मिळणार आहे. यात्रेचा प्रवास रेल्वेने होणार असून, प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास या बाबींचा समावेश या योजनेत असून, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर ही योजना राबवली जाणार आहे.
या योजनेचा लाभ कोण घेऊ शकते?
- इच्छुक लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक
- वय ६० वर्षांपेक्षा अधिक असावे.
कोठे संपर्क साधायचा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांच्या कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासाठी अंतिम मुदत २० मे २०२६ ही आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment