अमृत परिवार सर्वेक्षणामुळे जवळून समजली गावातील परिस्थिती

भंडारा जिल्ह्यातील काही नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षणामुळे जवळून समजली गावातील परिस्थिती मुख्य फोटो
अमृत परिवार सर्वेक्षणामुळे जवळून समजली गावातील परिस्थिती अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यातील काही अनुभव...

या सर्वेक्षणात माझ्याकडे बेला, खोकुरला, भोजापूर या ग्रामीण भागांची जबाबदारी होती. तालुक्यातील ग्रामसेवकांशी संपर्क साधून लक्ष्यित गटांची माहिती गोळा केली. त्यानंतर ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन अमृत संस्थेबद्दल व योजनांबद्दल माहिती दिली. या कामात ग्रामसेवकांकडून चांगले सहकार्य मिळाले. गावागावांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांना योजनांबद्दल समजावून सांगितले. अनेक लोकांनी उत्सुकतेने माहिती घेतली आणि योजनांचा लाभ घेण्याची तयारी दाखवली. फोन व प्रत्यक्ष संपर्काद्वारे तालुका स्तरावर सर्वेक्षण पूर्ण केले.

या कामातून मला लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव मिळाला. लोकांचा वेळ न मिळणे, कार्यालयातून संपर्क केल्यास कॉल कट केला जाणे अथवा सर्वेक्षणास टाळाटाळ करणे, अशा अनेक अडचणीही आल्या; पण दुसरीकडे काही लोकांनी सर्वेक्षणाचे उद्दिष्ट व महत्त्व समजून घेऊन उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. हळूहळू संवाद वाढत गेला. सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे आत्मविश्वास वाढला, काम करण्यास नवीन ऊर्मी मिळाली आणि काम सोपे झाले.

या सर्वेक्षणामुळे गावातील लोकांची परिस्थिती, त्यांचे व्यवसाय, आणि त्यांना कोणत्या प्रकारच्या योजनांची गरज आहे हे समजले. एकंदरीतच गावातील परिस्थिती जवळून समजली आणि हा अनुभव माझ्यासाठी खूप उपयोगी ठरला. यामुळे पुढील काम करताना अधिक स्पष्ट दिशा मिळेल.

साक्षी प्रशांत जोशी

अमृतसखी, भंडारा

Publisher: साक्षी प्रशांत जोशी News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 05:17 PM News publication time | Views: 422 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: साक्षी प्रशांत जोशी News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 05:17 PM News publication time | Views: 422 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement