जनसंपर्क वाढवण्याच्या कार्यात यश
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. गडचिरोली जिल्ह्यातील काही नोंदी...
आजच्या मोबाइल-कम्प्युटरच्या युगात कुणी कुणाकडे जात नाही. परंतु अमृत संस्थेच्या परिवार सर्वेक्षण मोहिमेच्या माध्यमातून आम्ही घरोघरी प्रवास केला. प्रत्यक्ष भेटी घेतल्या. या भेटींमध्ये अनेक चांगले-वाईट अनुभव गाठीशी आले. काही घरी उत्तम आदरातिथ्य झाले. लक्ष्यित गटातील परिवाराने आनंदाने संपूर्ण परिवाराची माहिती दिली. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरण्यात आली.
काही नागरिकांनी आपली मुले-मुली बाहेरगावी असल्याचे सांगितले. तसेच, काही जणांची मुले विदेशात असल्याचेही कळले. ग्रामपंचायत सर्वेक्षण करताना लावलेल्या स्टिकर्सही संस्थेचा उपयोग झाला. कारण त्यावरील नंबर पाहून अमृत संस्थेबद्दल माहिती विचारायला कॉल येतात. अमृत कार्यालयात आलेल्या कॉलवर ही खरेच महाराष्ट्र शासनाची संस्था आहे का, असेही विचारले जाते; मात्र त्यांना संपूर्ण माहिती देऊ आश्वस्त केले जाते. तसेच, अधिक माहितीसाठी त्यांना अमृत कार्यालयातही आमंत्रित केले जाते. एकंदरीतच अमृत परिवार सर्वेक्षणामुळे जनसंपर्क वाढवण्याच्या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत यश मिळाले.
सौ. माधुरी महेश रोटकर
अमृतसखी
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment