अमृत परिवार सर्वेक्षणामुळे वाढला प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद

अकोला जिल्ह्यात गावपातळीवर अमृत योजनांची प्रभावी जनजागृती

अमृत परिवार सर्वेक्षणामुळे वाढला प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अकोला जिल्ह्यातील काही नोंदी...

अमृत परिवार सर्वेक्षण अभियानांतर्गत अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा, तसेच इतर अनेक गावांमध्ये प्रत्यक्ष भेटी देण्यात आल्या. अकोला जिल्ह्यातील १८० गावांपैकी जास्तीत जास्त गावांमध्ये प्रवास करून सर्वेक्षणाचे काम करण्यात आले. गावागावांमध्ये जाऊन नागरिकांशी भेट संपर्क साधण्यात आला. या भेटींवेळी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तहसीलदार, तसेच पंचायत समितीतील प्रमुख व्यक्तींशी संवाद साधून माहिती घेण्यात आली. 

जनजागृतीसाठी विविध ठिकाणी अमृत संस्थेची पोस्टर्स लावण्यात आली. तसेच गावातील नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्याकडून आवश्यक माहिती मिळवली. या सगळ्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले. नागरिकांना भेट देऊन सर्वेक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि गरजा समजून घेण्यात आल्या. अनेक ठिकाणी नागरिकांना अमृत योजनांची पुरेशी माहिती नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना उपलब्ध योजनांची माहिती समजावून सांगण्यात आली. तसेच त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना कोणत्या योजनांचा लाभ मिळू शकतो आणि आणखी कोणत्या योजनांचा लाभ देता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानामुळे नागरिकांमध्ये शासकीय योजनांबद्दल जागरूकता वाढली. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि सहकार्य केले. 

गावातील वातावरण सकारात्मक होते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या सर्वेक्षणाच्या आधारे समाजातील अधिकाधिक लोकांना विविध योजनांचा लाभ देता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येतील. जास्तीत जास्त पात्र नागरिकांपर्यंत योजना पोहोचून त्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. या संपूर्ण प्रक्रियेमुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाला असून, गरजूंपर्यंत योग्य त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात मदत झाली.

- धनंजय गोपाळराव कुळकर्णी

अकोला जिल्हा व्यवस्थापक, अमृत

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 242 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 11:59 AM News publication time | Views: 242 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement