अमृत परिवार सर्वेक्षण : लक्ष्यित गटाला योजनांचा लाभ देण्यासाठी प्रभावी जनसंपर्क

अकोला शहरातील काही नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षण : लक्ष्यित गटाला योजनांचा लाभ देण्यासाठी प्रभावी जनसंपर्क मुख्य फोटो
अमृत परिवार सर्वेक्षण : लक्ष्यित गटाला योजनांचा लाभ देण्यासाठी प्रभावी जनसंपर्क अतिरिक्त फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. अकोला शहरातील काही नोंदी...

या सर्वेक्षणाच्या निमित्ताने अकोला शहराच्या विविध भागांमध्ये प्रत्यक्ष भेट दिली. घराघरांत जाऊन नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना अभियानाचे महत्त्व समजावून सांगितले. काही ठिकाणी सुरुवातीला लोकांकडून थोडा संकोच दिसून आला; मात्र शांतपणे आणि विश्वासाने संवाद साधल्यामुळे त्यांचा प्रतिसाद सकारात्मक मिळाला. सर्वेक्षण करताना माहिती व्यवस्थित आणि अचूक पद्धतीने नोंदवण्यावर विशेष भर दिला. नागरिकांनी दिलेली माहिती गोपनीयता राखून व योग्य प्रकारे संकलित केली. या प्रक्रियेमुळे अनेक कुटुंबांशी जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्या अडचणी व गरजा समजून घेण्याची संधी मिळाली. 

काही नागरिकांना या अभियानाबद्दल सुरुवातीला शंका वाटत होती. परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी सहकार्य केले. विविध योजनांची माहिती देताना त्यांच्यात जागरूकता निर्माण झाली आणि त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि काही लाभार्थी सुद्धा मिळाले. एकूणच, अमृत परिवार सर्वेक्षण अभियानामुळे अकोला शहरात सामाजिक एकात्मता वाढवण्यास मदत झाली. या सर्वेक्षणातून मिळालेली माहिती भविष्यातील विकासात्मक कामांसाठी उपयुक्त ठरेल आणि लक्ष्यित घटकातील लोकांना योजनांचा लाभ देता येईल. अमृत परिवार सर्वेक्षणामुळे लोकांच्या अडचणी समजल्या आणि त्या सोडवण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो हे समजले.

प्राची प्रवीण देव 

अमृतसखी, अकोला

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 12:05 PM News publication time | Views: 441 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 12:05 PM News publication time | Views: 441 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement