योजनांची माहिती मिळताच नागरिकांमध्ये निर्माण झाला विश्वास आणि उत्साह

अमृत परिवार सर्वेक्षणाला जालना जिल्ह्यात चांगला प्रतिसाद

योजनांची माहिती मिळताच नागरिकांमध्ये निर्माण झाला विश्वास आणि उत्साह मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. जालना जिल्ह्यातील काही नोंदी...

अमृत संस्थेच्या परिवार सर्वेक्षण कालावधीत अनेक कुटुंबांना प्रत्यक्ष भेटण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटींमध्ये नागरिकांच्या समस्या, गरजा, अपेक्षा आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध बाबी जवळून समजून घेता आल्या. शिक्षण, रोजगार, आरोग्य, शेती, आर्थिक अडचणी, तसेच स्वयंरोजगाराशी संबंधित प्रश्न अनेक नागरिकांनी मांडले. प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असली, तरी अनेक ठिकाणी समान समस्या दिसून आल्या.

अनेक नागरिकांना शासनाच्या विविध योजनांची पुरेशी माहिती नसल्याचे या वेळी दिसून आले. काही नागरिकांना योजनांची माहिती असली, तरी त्यांचा लाभ कसा घ्यायचा, अर्जप्रक्रिया कशी असते आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती याची माहिती नव्हती. नागरिकांना विविध शासकीय योजना, त्यांचे फायदे आणि उपलब्ध संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

अनेक नागरिकांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाबाबत, रोजगाराच्या संधींबाबत आणि महिलांसाठी उपलब्ध योजनांविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. योग्य माहिती आणि मार्गदर्शन मिळाल्यास समाजामध्ये सकारात्मक बदल घडू शकतो, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

या परिवार सर्वेक्षण मोहिमेदरम्यान अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, मी (उपव्यवस्थापक चिंतेश जोशी) आणि अमृतसखी अश्विनी ताई कुलकर्णी यांनी नागरिकांशी संवाद साधून विविध योजनांची माहिती दिली व मार्गदर्शन केले. नागरिकांकडून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, त्यांचे सहकार्य आणि त्यांनी दाखवलेला विश्वास पाहून समाजासाठी अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळाली.

या सर्वेक्षणामुळे केवळ माहिती संकलन झाले नाही, तर समाजातील लोकांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याची संधी मिळाली. नागरिकांमध्ये दिसून आलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि उत्साह हा सर्वेक्षणाचा सर्वांत महत्त्वाचा आणि समाधानकारक अनुभव ठरला.

चिंतेश जोशी

जालना जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 02:21 PM News publication time | Views: 188 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news
Publisher: Chintesh Joshi News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 02:21 PM News publication time | Views: 188 Number of times this news has been viewed | District: Jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement