अमृत सर्वेक्षणावेळी नाशिक जिल्ह्यात आलेला हृद्य अनुभव
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील एक हृद्य अनुभव...
मे महिना चालू असल्याने घरातून सकाळी लवकरच अमृत परिवार सर्वेक्षणासाठी निघालो. मालेगावपासून साधारणपणे ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या घाणेगावात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोहोचलो. गावात राजपूत समाज मोठ्या संख्येने असून, जाट समाजाचीसुद्धा घरे आहेत. गावातील श्यामसिंह राजपूत यांना भेटलो आणि अमृत संस्थेच्या योजनांची व परिवार सर्वेक्षणाची संपूर्ण माहिती दिली. त्यावर ते अतिशय आनंदित झाले. 'तुम्ही समाजासाठी खूप मोठे काम करताय. एवढ्या उन्हात आला आहात,' असे सांगून त्यांनी जेवून जाण्याचा आग्रहच धरला पुढे अनेक गावांमध्ये सर्वेक्षण करायचे असल्याने आम्ही नम्रपणे नकार दिला; पण ते काही ऐकायलाच तयार नव्हते. शेवटी 'सरबत तरी घ्या' असे म्हणून हट्टच धरला आणि सरबत पिऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. अमृत संस्थेबद्दल त्यांना वाटलेली आपुलकी आणि एकंदरीत त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आम्ही भारावून गेलो.
अजिंक्य कन्नाल
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment