रोजगाराभिमुख प्रशिक्षण व वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनांबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल

अमृत परिवार सर्वेक्षणाच्या नाशिक जिल्ह्यातील काही नोंदी

रोजगाराभिमुख प्रशिक्षण व वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनांबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल  मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यातील काही नोंदी...

अमृत परिवार सर्वेक्षण करताना अनेक वेगवेगळ्या कुटुंबाशी संवाद साधता आला. सुरुवातीला तर खुल्या प्रवर्गासाठी महाराष्ट्र शासनाने अमृत या स्वायत्त संस्थेची स्थापना केली आहे, याची लक्ष्यित गटातील नागरिकांना माहिती दिल्यावर ते अचंबित झाले. लोकांना अमृत संस्थेच्या सर्व योजनाची सखोल माहिती देत गेलो, तसतसा लक्ष्यित गटातील नागरिकांनी स्वतःची माहिती देण्यासाठी उत्साहाने प्रतिसाद दिला. त्यात घोटी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरातील नागरिकांचा समावेश होता. रोजगाराभिमुख प्रशिक्षण व वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा या योजनांबाबत मोठे कुतूहल त्यांना असल्याचे पाहायला मिळाले. योजनांबाबत माहिती देताना काही सुशिक्षित तरुणांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाबद्दल विविध शंका उपस्थित केल्या. त्यांचे निरसन केले. काही कुटुंबांना संस्थेच्या योजनांविषयक माहिती उशिरा मिळूनदेखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अमृत संस्था खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकापर्यंत यशस्वीरीत्या पोहचण्यासाठी कार्यरत आहे.

मयूर हातवळणे

Publisher: Mayur Hatwalne News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 03:14 PM News publication time | Views: 398 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mayur Hatwalne News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 03:14 PM News publication time | Views: 398 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

S
Sachin Kulkarni
21-05-2026 11:26 AM

जय अमृत

Write a Comment
0 / 50 words
Advertisement