संस्कार, अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणांचा सुंदर समन्वय साधणारे अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ

अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील कुऱ्हा (बहिरम) येथील प्रेरणादायी उपक्रम

संस्कार, अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणांचा सुंदर समन्वय साधणारे अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ मुख्य फोटो
संस्कार, अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणांचा सुंदर समन्वय साधणारे अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ अतिरिक्त फोटो

अमृत सर्वेक्षणानिमित्ताने अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार तालुक्यातील कुऱ्हा (बहिरम) या गावाला भेट देण्याची संधी मिळाली. गावातील विविध सामाजिक, शैक्षणिक व जनकल्याणकारी उपक्रमांची माहिती घेत असताना एक अत्यंत प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशादर्शक कार्य प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळाला.

गावातील समाजाभिमुख नागरिक अखिलेश भारतीय, अनंत भारतीय आणि मुकुंद भारतीय यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क वारकरी संप्रदाय शिक्षण सुरू करून संस्कार, अध्यात्म आणि आधुनिक शिक्षण यांचा सुंदर समन्वय साधण्याचा प्रेरणादायी प्रयत्न केला आहे. त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य दिशा, संस्कार आणि शिक्षणाची नवी संधी उपलब्ध होत असल्याचे जाणवले. या भेटीवेळी माऊली कृपांकित अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ येथे सुरू असलेल्या कार्याची माहिती जाणून घेतली. ज्ञानपीठात प्रवेश करताच तेथील शिस्तबद्ध वातावरण, स्वच्छ परिसर आणि विद्यार्थ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सुविधा पाहून मनापासून समाधान वाटले.

हे ज्ञानपीठ केवळ धार्मिक शिक्षणापुरते मर्यादित नसून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत आहे. येथे पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना निःशुल्क वारकरी शिक्षणासोबत शालेय व तंत्रज्ञान आधारित शिक्षण दिले जाते. विशेष म्हणजे वारकरी संप्रदायाचे सखोल शिक्षण देण्यासाठी आळंदी येथील अनुभवी गुरुजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. अध्यात्मासोबत आधुनिक शिक्षणाची सांगड घालण्याचा हा प्रयत्न खरोखरच प्रेरणादायी वाटला. ज्ञानपीठातील अध्ययन कक्ष, संगणक कक्ष, वाचनालय, निवास व्यवस्था आणि भोजन कक्ष यांसारख्या सुविधा अत्यंत सुस्थितीत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा दर्जेदार सुविधा पूर्णपणे निःशुल्क उपलब्ध करून देणे ही मोठी सामाजिक सेवा आहे.

हा उपक्रम विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी सुरू असलेल्या सकारात्मक आणि समाजहिताच्या कार्यांपैकी एक असल्याचे प्रकर्षाने जाणवले. अशा उपक्रमांना समाजातील प्रत्येक घटकाने सहकार्य करणे आवश्यक असून भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांना या ज्ञानपीठाचा लाभ घ्यावा , हीच अपेक्षा. आजच्या काळात शिक्षण क्षेत्र अधिक व्यावसायिक होत असताना, ग्रामीण विद्यार्थ्यांना संस्कारयुक्त आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सुरू असलेला हा उपक्रम समाजासाठी आदर्श उदाहरण आहे. परंपरेतील संस्कारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

पत्ता : माऊली कृपांकित अप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ,

कुऱ्हा (बहिरम), ता. चांदूरबाजार, जि. अमरावती

अमरावती जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

Publisher: ऋषिकेश कथलकर News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 03:25 PM News publication time | Views: 117 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news
Publisher: ऋषिकेश कथलकर News publisher name | Date: 19-05-2026 News publication date | Time: 03:25 PM News publication time | Views: 117 Number of times this news has been viewed | District: amaravati Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement