कलेच्या साह्याने उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टाळू कुटुंबाच्या प्रगतीला 'अमृत'मुळे नवी दिशा

अमृत परिवार सर्वेक्षणातील नांदेड जिल्ह्यातील हृद्य अनुभव

कलेच्या साह्याने उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टाळू कुटुंबाच्या प्रगतीला 'अमृत'मुळे नवी दिशा मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. नांदेड जिल्ह्यातील हृद्य अनुभव...

नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यात अमृत परिवार सर्वेक्षणावेळी एका प्रेरणादायी आणि कष्टाळू कलाकार कुटुंबाची ओळख झाली. त्या घरातील प्रत्येक सदस्य आपली कला आणि मेहनतीच्या जोरावर उदरनिर्वाह करत असल्याचे दिसून आले. कुटुंबप्रमुख व्यक्ती कमी पगारावर शाळेत संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या पत्नी घरी संगीतवर्ग चालवतात, तर १२ वर्षांची मुलगी तबला शिकवते आणि दुसरी मुलगी मेंदीचे क्लास घेते. संपूर्ण कुटुंब कला जोपासून स्वाभिमानाने जीवन जगताना पाहून समाधान वाटले.

अमृत संस्थेबद्दल माहिती मिळाल्यानंतर या कुटुंबाने स्वतःहून संपर्क साधून सर्वेक्षणासाठी आमंत्रित केले. अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती त्यांनी उत्सुकतेने ऐकून घेतली. तसेच लक्ष्यित गटातील महिलांसाठी प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली; मात्र या कुटुंबासमोर एक मोठी अडचण होती. 'आम्ही कलाकार असल्यामुळे बँका सहज कर्ज देत नाहीत. संगीत क्षेत्रात व्यवसाय वाढवण्यासाठी वाद्ये आणि आनुषंगिक साहित्याची खरेदी करायची आहे. त्यासाठी निधीची गरज आहे,' असे त्यांनी सांगितले. कला क्षेत्रातील व्यक्तींना संधी कमी मिळत असल्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये आर्थिक अडचणी मोठा अडसर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या समस्येची दखल घेऊन जिल्हा व्यवस्थापकांनी भाग्यलक्ष्मी बँकेच्या व्यवस्थापकांशी चर्चा करून त्या कुटुंबाला मार्गदर्शन केले. सकारात्मक चर्चेनंतर बँकेने त्या कुटुंबाला एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची तयारी दर्शवली. तसेच अमृत संस्थेमार्फत वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेचाही लाभ त्यांना देण्यात येणार आहे.

अमृत परिवार सर्वेक्षणातून केवळ माहिती संकलनच नव्हे, तर गरजू आणि गुणवंत कुटुंबांना प्रत्यक्ष मदतीचा हात देण्याचे कार्यही प्रभावीपणे होत असल्याचे या उदाहरणाने दाखवून दिले आहे.

- सौरभ संतोष माळहिप्परगेकर 

नांदेड जिल्हा व्यवस्थापक, अमृत

Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 01:25 PM News publication time | Views: 163 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: Saurabh Kulkarni News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 01:25 PM News publication time | Views: 163 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement