अधिक मासातील एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व

तीन वर्षांनी येणारी कमला एकादशी

अधिक मासातील एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व मुख्य फोटो
मुख्य फोटो

हिंदू धर्मात अधिक मास अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. या महिन्यात भगवान विष्णूची उपासना, जप, दान, व्रत आणि धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते. अधिक मासात येणारी एकादशी ही इतर एकादशींपेक्षा अधिक फलदायी मानली जाते. या दिवशी उपवास, नामस्मरण आणि भक्तिभावाने केलेली पूजा मनाला शांती देणारी ठरते. 

एकादशीचे धार्मिक महत्त्व

प्रत्येक महिन्यात दोन एकादश्या येतात. एकादशी ही भगवान विष्णूंना प्रिय असलेली तिथी. या दिवशी उपवास केल्याने पापांचा नाश होतो आणि मन शुद्ध होते. अधिक मासातील एकादशीला केलेले व्रत अनेक पटींनी पुण्य देणारे मानले जाते. अधिक मासातील दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी असे म्हणतात. अधिक मासात येत असल्याने साहजिकच या एकादश्या तीन वर्षांतून एकदाच येतात.

अधिक मासातील उपवास आणि पूजा

अधिक मासातील एकादशीला अनेक भाविक दिवसभर उपवास करतात. काही जण फलाहार घेतात, तर काही जण निर्जळी उपवास करतात. सकाळी स्नान करून भगवान विष्णू, विठ्ठल किंवा श्रीकृष्णाची पूजा केली जाते. 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप विशेष फलदायी मानला जातो.

आध्यात्मिक लाभ

एकादशीचा उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून आत्मशुद्धीचा मार्ग मानला जातो. या दिवशी मनातील नकारात्मक विचार दूर करून भक्ती, संयम आणि साधनेचा मार्ग स्वीकारला जातो. अधिक मासातील एकादशी मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आध्यात्मिक समाधान देते.

दानधर्माचे महत्त्व

या दिवशी अन्नदान, वस्त्रदान, गोरगरिबांना मदत आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यांना विशेष महत्त्व आहे. अधिक मासात केलेले दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते.

एकादशीचा उपवास हा केवळ धार्मिक विधी नसून, आत्मशुद्धीचा मार्ग मानला जातो. या दिवशी मनातील नकारात्मक विचार दूर करून भक्ती, संयम आणि साधनेचा मार्ग स्वीकारला जातो. अधिक मासातील एकादशी मनाला शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि अध्यात्मिक समाधान मिळते .

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 02:35 PM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 27-05-2026 News publication date | Time: 02:35 PM News publication time | Views: 127 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement