पर्यटन व्यवसायाला 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेमुळे गती - अमृत महाराष्ट्र

पर्यटन व्यवसायाला 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेमुळे गती

छत्रपती संभाजीनगरमधील मंगेश अनिल कुलकर्णींना मिळाला ८७,२०८ रुपयांचा लाभ

पर्यटन व्यवसायाला 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेमुळे गती मुख्य फोटो
पर्यटन व्यवसायाला 'अमृत'च्या व्याजपरतावा योजनेमुळे गती अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : येथील मंगेश अनिल कुलकर्णी हे श्रीवल्लभ टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने पर्यटन व्यवसाय यशस्वीपणे चालवत आहेत. प्रवास सेवा, विविध टूर पॅकेजेस आणि ग्राहकांना दर्जेदार सुविधा देऊन त्यांनी आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने उभा केला आहे. व्यवसाय अधिक विस्तारावा, नवीन संधी मिळाव्यात या उद्देशाने त्यांनी १५ लाख रुपयांचे व्यावसायिक कर्ज घेतले; मात्र कर्जासोबत येणारा व्याजाचा आर्थिक ताण त्यांना जाणवू लागला. तेवढ्यातच त्यांना अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ या योजनेसाठी अर्ज केला. सर्व आवश्यक कागदपत्रे आणि निकष पूर्ण केल्यामुळे त्यांचा अर्ज मंजूर झाला. योजनेअंतर्गत नुकतेच त्यांना कर्जावरील व्याजाचा परतावा म्हणून ८७,२०८ रुपये मिळाले आहेत.

हा लाभ मिळाल्याने मंगेश कुलकर्णी यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. व्याजाचा भार कमी झाल्यामुळे आता ते व्यवसाय सुधारणा, सेवा गुणवत्ता वाढवणे आणि व्यवसाय विस्तारावर अधिक लक्ष केंद्रित करू शकत आहेत. आत्मविश्वासाने पुढची पावले टाकण्याची ऊर्जा त्यांना या योजनेमुळे मिळाली आहे.

अमृत संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी मंगेश कुलकर्णी यांची भेट घेऊन त्यांचे मनापासून अभिनंदन केले. अमृत संस्थेच्या योजनेचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा संदेश त्यांनी या वेळी दिला.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतच्या संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सला भेट द्यावी..

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475
छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय,
पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको,
हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ,
छत्रपती संभाजीनगर- ४३१००९

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 11:03 AM News publication time | Views: 291 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 29-12-2025 News publication date | Time: 11:03 AM News publication time | Views: 291 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement