प्रशिक्षण द्यायला अमृत संस्था आहे ना!
ग्रामीण तरुणांसाठी ड्रोन पायलट व सोलर इन्स्टॉलेशन हे सुवर्णसंधीचे क्षेत्र आहे. अल्प कालावधीच्या प्रशिक्षणातून ड्रोनद्वारे शेती, सर्वेक्षण व सेवांमध्ये लाखोंची कमाई शक्य आहे. सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन शिकून शाश्वत ऊर्जेच्या वाढत्या मागणीतून मोठा व्यवसाय उभारता येतो. कमी भांडवलात, गावातच रोजगार व उद्योजकतेची नवी दारे उघडणारी ही कौशल्ये तरुणांचे भविष्य उज्ज्वल करू शकतात. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही संस्था यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण कार्यक्रम लक्ष्यित गटातील उमेदवारांसाठी निःशुल्क स्वरूपात राबवते.
ग्रामीण तरुणांसाठी सुवर्णसंधी
ड्रोन पायलट आणि सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन
आजचा काळ तंत्रज्ञानाचा आहे. शेती, उद्योग, ऊर्जा, सुरक्षा आणि सर्वेक्षण या प्रत्येक क्षेत्रात आधुनिक साधनांचा वापर वाढत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण तरुणांसाठी ड्रोन पायलट व सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन ही दोन क्षेत्रे भविष्यातील सुवर्णसंधी ठरत आहेत.
ड्रोन पायलट
पूर्वी ड्रोन म्हणजे केवळ लष्करी वापर असे मानले जात होते; मात्र आज शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण या सर्व ठिकाणी ड्रोनची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
- केवळ काही आठवड्यांचे प्रशिक्षण घेऊन ग्रामीण तरुण ड्रोन पायलट बनू शकतात.
- एका दिवसात पाच हजार ते २५ हजार रुपये उत्पन्न मिळवण्याची संधी आहे.
- स्वतःचा ड्रोन घेतल्यास स्वयंरोजगाराची दारे उघडतात.
सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन
वीज महाग होत असताना सौर ऊर्जेची मागणी झपाट्याने वाढत आहे. सरकारच्या योजनांमुळे सोलर पॅनेल्स बसवण्याला मोठे प्रोत्साहन मिळत आहे.
सोलर इन्स्टॉलेशन शिकल्यावर घरगुती सोलर प्रकल्प, शेतीसाठी सोलर पंप, शासकीय व खासगी प्रकल्प, कारखाने, शाळा, कार्यालये येथे ते बसवणे शक्य होते.
- सुरुवातीला महिन्याला ५० हजार ते एक लाख रुपये सहज कमाई
- पुढे स्वतःचा व्यवसाय उभारून कोट्यवधीचा टर्नओव्हर शक्य
- ग्रामीण भागात मोठी मागणी, कमी स्पर्धा
ग्रामीण तरुणांसाठी का महत्त्वाचे?
- रूढ शिक्षण कमी असले तरी संधी उपलब्ध
- कमी वेळात कौशल्य प्रशिक्षण
- नोकरीसोबत व्यवसायाची संधी
- गावातच रोजगार – स्थलांतर थांबेल
या माध्यमातून आजचा ग्रामीण तरुण नवा उद्योजक होऊ शकतो. ड्रोन पायलट आणि सोलर पॅनेल इन्स्टॉलेशन ही कौशल्ये आत्मसात करून तरुण स्वतःचे भविष्य उज्ज्वल करू शकतो आणि देशाच्या विकासातही हातभार लावू शकतो.
आजच प्रशिक्षण घ्या, संपन्नतेच्या वाटेवर चाला!
गोंदिया जिल्हा कार्यालय, अमृत
संपर्क : 9112228776
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment