सायबर सुरक्षा लेख-क्र.-१०
हल्ली मोठ्या वेगाने घडणारा हा एक असा फ्रॉड आहे की यात भले भले (उच्चशिक्षितही) फसत आहेत आणि बँक खाते झिरो होतेय. तर ते घडते नेमके कसे व त्यावर अडकू नये म्हणून उपाय काय ? तर काळजी करू नका.... तुमचा हा सायबर सुरक्षा दोस्त डॉ. डीडी आहे न ! तर ते सगळं स्टेप बाय स्टेट सांगतो. काळजीपूर्वक वाचून सावध राहा !
होत असं की, तुमच्या बँक खात्यात अचानक ₹1,000 किंवा ₹2,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येतो. तुम्हाला आश्चर्य वाटतं... “हे पैसे कुणी पाठवले?”
मग तुम्ही ते तपासण्यासाठी GPay किंवा तुमचं बँकिंग अँप उघडता आणि PIN टाकता. इथेच सावध व्हा! अशा प्रसंगी सायबर भामटे तुम्हाला एखादी UPI Collect/Payment Request, बनावट लिंक, QR Code किंवा इतर फसवणुकीची पद्धत वापरून पैसे पाठवायला किंवा व्यवहाराला मंजुरी द्यायला प्रवृत्त करू शकतात. अशावेळी तुम्हाला गोड बोलून घोळात घेऊन (हिप्नोटाईसारखं) अथवा दमबाजी करून दिलेल्या लिंक / कोडला क्लिक करायला लावतात आणि तिथेच गडबड होते. त्यामुळं.....
⚠️ एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा: फक्त UPI PIN टाकून अँप उघडल्यामुळे किंवा बॅलन्स पाहिल्यामुळे तुमच्या खात्यातून पैसे आपोआप जात नाहीत. कारण याविषयी काही व्हिडीओ पाहिले त्यात "पिन टाकला अन बँक खाते रिकामे झाले" असं सांगण्यात येत आहे. तर तसे काही नसते. तो भ्रम दूर करण्यासाठीच हा प्रपंच !
UPI PIN हा व्यवहार authorize करण्यासाठी असतो. म्हणून अनोळखी व्यक्तीकडून अचानक पैसे आले असतील तर घाईघाईने कोणतीही Payment Request स्वीकारू नका, “Pay” करू नका, QR Code scan करू नका आणि अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
आणि सर्वात महत्त्वाचं—
💡 पैसे RECEIVЕ करण्यासाठी UPI PIN लागत नाही!
कोणी तुम्हाला पैसे पाठवत असेल आणि त्यासाठी “PIN टाका”, “Pay करा”, “Approve करा” असं सांगत असेल तर सावध व्हा. मग आता काय करायचं?
✅ सर्वात महत्वाचे म्हणजे असे काही पैसे आलेच समजा तर लगेच समोरचा सांगेल त्या स्टेप्स करू नका. उलट पंधरा वीस मिनिटाचा गॅप जाऊ द्या. त्यामुळे आपोआपच समोरच्याने काही क्रिएट करून ट्रॅप लावला असेल तर त्यासाठीचा त्याला मिळणाऱ्या OTP ची व्हॅलिडिटी आपोआप संपून जाते आणि तुम्ही सुरक्षित राहता. थोडक्यात काय तर कुणाचेही पैसे आले तर लगेच PiN टाकून बॅलन्स चेक करायला जाऊ नका,
✅ अनोळखी व्यक्तीकडून पैसे आले तर त्याचा स्रोत तपासा. म्हणजे कोण आहे तो ? का पाठवतोय इत्यादि
✅ कोणतीही अनोळखी Payment/Collect Request आली तर ती स्वीकारू नका. yes असेल क्लिक करू नका
✅ पैसे मिळवण्यासाठी PIN, OTP किंवा UPI PIN कुणालाही सांगू नका.
✅ संशयास्पद व्यवहार झाल्याचं लक्षात आलं तर वेळ न दवडता 1930 वर कॉल करा.
✅ तसेच National Cyber Crime Reporting Portal वर तक्रार नोंदवा.
घाबरू नका… पण घाईही करू नका!
सायबर फसवणुकीमध्ये तुमची घाई हीच भामट्यांची ताकद असते. माहिती घ्या, तपासा आणि मगच कोणताही आर्थिक व्यवहार करा. -
तुमचा सायबर दोस्त
- डॉ. धनंजय देशपांडे.(dd)
National level awards ( 3 Times)
State level awards ( 3 Times)
HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
Mentor : Pune University, CANADA & UK
Guest Author for Amrut Maharashtra Portal (State Govt. Dept.)
• सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007
• सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण गुन्हेगारी विश्वात खळबळ-
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2123
• सायबर सुरक्षा-लेख क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
कारमध्ये dashcam हवाच !- तो खर्च वाढवत नाही तर वाचवतो
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2258
• सायबर सुरक्षा-लेख-क्र-४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
तुमची फोटो गॅलरी म्हणजे खाजगी डायरी- ती भामट्यांच्या हातात पडण्यापासून जपा!
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2403
• सायबर सुरक्षा-लेख-क्र-५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
ना ओटीपी दिला ना लिंक क्लिक केली तरी तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2565
• सायबर सुरक्षा-लेख-क्र-६ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
ताणतणावातून येणारा हार्टअटॅक टाळायचाय?..मग ३ मिनिट वेळ काढून वाचा!
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2730
• सायबर सुरक्षा-लेख-क्र-७ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
मोबाईलमधील फोटो डिलीट झालेत? फोटो परत मिळू शकतात, पॅनिक होऊ नका !
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2864
• सायबर सुरक्षा-लेख-क्र-८ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
फोन खरोखर हॅक झाला आहे का? हे कसे ओळखाल?
https://amrutmaharashtra.org/news.php?id=3059
• सायबर सुरक्षा-लेख-क्र-९ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
तुमची चूक नसताना फ्रॉडमध्ये! पैसे गेले तर बँक जबाबदार
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment