रक्षाबंधनाचे सामाजिक महत्त्व
'रक्षाबंधन' हा केवळ बहीण-भावाच्या नात्यापुरता मर्यादित असलेला सण नसून, तो संपूर्ण समाजाला स्नेहाच्या आणि सुरक्षेच्या धाग्यात बांधणारा एक महान सांस्कृतिक उत्सव आहे. बहेना ने भाई के कलाई पे प्यार बाँधा है, प्यार के दो तार से संसार बाँधा है... या ओळींमधून व्यक्त होणारा स्नेह केवळ एका कुटुंबापुरता मर्यादित न राहता, तो व्यापक समाजहित आणि राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेला आहे. कुटुंब व्यवस्था दृढ करणारा उत्सव: सुदृढ कुटुंब व्यवस्था ही आपल्या समाजव्यवस्थेचे अभिन्न अंग व आधार आहे. बदलत्या परिस्थितीत कौटुंबिक कलह , नात्यांमधील दुरावा दूर करून भाऊ, बहीण व सर्व परिवाराला एकत्र आणणारा एक महत्त्वाचा सण अस याच कौटुंबिक महत्व आहे. प्राचीन संदर्भ आणि सांस्कृतिक वारसा रक्षाबंधनाचा इतिहास प्राचीन परंपरेशी जोडलेला आहे. महाभारतातील श्रीकृष्ण आणि द्रौपदीची कथा याचे उत्तम उदाहरण आहे. द्रौपदीने श्रीकृष्णाच्या हाताला बांधलेला पदराचा तुकडा आणि श्रीकृष्णाने तिच्या रक्षणासाठी घेतलेला संकल्प, हा रक्षेच्या बंधनाचा मूळ गाभा आहे. संस्कृतमधील पुढील श्लोक रक्षाबंधनाची मूळ संकल्पना स्पष्ट करतो:
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः। तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल॥
(अर्थ: ज्या रक्षासूत्राने महान पराक्रमी दानवराज बली याला बांधले होते, त्याच रक्षासूत्राने मी तुला बांधत आहे. हे रक्षाकवचा, तू स्थिर राहा आणि माझे रक्षण कर.)
सामाजिक समरसता आणि रक्षेचा संकल्प आजच्या काळात रक्षाबंधनाचे स्वरूप अधिक व्यापक झाले आहे. हे केवळ एका धाग्याचे बंधन नसून स्वखुशीने आणि नैतिक जबाबदारीने स्वीकारलेले रक्षेचे बंधन आहे. * दुर्बल घटकांचे रक्षण: समाजातील वंचित, दुर्बल आणि अनाथ घटकांना सुरक्षेची व आधाराची भावना देणे ही या सणाची खरी भावना आहे.
* बंधुभाव व समरसता: जात, पात आणि पंथ यांपलीकडे जाऊन समाजात ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक समरसतेचे जागरण करण्याचे सामर्थ्य या उत्सवात आहे. * सांस्कृतिक एकतेचा धागा: भारताच्या सर्व प्रांतात वेगवेगळ्या नावाने पण एकाच भावनेने साजरा केला जाणारा हा सण देशाच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे. देश, धर्म आणि समाज रक्षणाचा सेवा संकल्प रक्षाबंधनाचा धागा आपल्याला केवळ वैयक्तिक रक्षणाचीच नव्हे, तर देश, धर्म, समाज आणि संस्कृतीच्या रक्षणाची आठवण करून देतो. हा सण सेवा संकल्पाची प्रेरणा देतो. * सैनिकांप्रती कृतज्ञता: सीमेवर अहोरात्र पहारा देऊन देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना राखी बांधून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. *
अंतर्गत सुरक्षा दले: देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कार्यरत असणारे पोलीस दल, सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन सेवेतील कर्मचार्यांचे स्मरण करून त्यांच्या त्यागाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. रक्षाबंधन हा सण आपल्याला स्वार्थाच्या पलीकडे जाऊन 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' या भावनेने जगण्याची आणि समाजातील प्रत्येक घटकाला सुरक्षेचे कवच देण्याची प्रेरणा देतो.
स्वप्नील अनंतराव साकळे रिसोड जि. वाशीम ९६२३२०९९२५
संकलित -
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment