चित्रकार म्हणून डी. डी. रेगे उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असले तरी त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे, संतवस्तू संग्रहालयाची उभारणी. चित्रकार डी. डी. रेगे यांनी महाराष्ट्राच्या अनेकविध भागातील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील, नित्य हाताळलेल्या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा ध्यास घेतला. या उपक्रमाची सुरुवात बेट केडगावच्या नारायण महाराजांमुळे झाली. बेट केडगाव येथे चित्रकार डी. डी. रेगे यांनी नारायण महाराजांचे भव्य पेंटिंग्ज करून दिले त्यावेळी प्रसाद म्हणून नारायण महाराजांच्या नित्य वापरातील वस्तू (जरीची टोपी, कौपीन) चित्रकार डी. डी. रेगे यांना प्रसादभेट म्हणून दिल्या गेल्या. यांतूनच चित्रकार डी. डी. रेगे यांच्या मनांत संतवस्तूंचा संग्रह करण्याची ऊर्मी दाटून आली आणि एकामागोमाग एक अशा अनेक संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील वस्तूंचा संचय त्यांच्याकडे होत गेला. पाहता पाहता, चित्रकार डी डी. रेगे हे नाव पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने प्रकाशात आले.
जन्म. १७ डिसेंबर १९११ रत्नागिरी जिल्ह्यातील 'पाचल' येथे. दत्तात्रय धोंडो रेगे उर्फ डी. डी. रेगे यांचे बालपण कोकणातल्या निसर्गसमृद्ध 'पाचल' येथे गेले. याच परिसराने डी. डी. रेगे यांच्यातील कलाकाराला जागृत केले, कलाविष्काराकडे पाहण्याची रसिक नजर बहाल केली. पुढे काही कारणाने, सातारा येथे स्थलांतरित झाल्यावर न्यू इंग्लिश स्कूल, सातारा आणि तात्कालिक सरकारी हायस्कुलात दाखल झालेल्या डी. डी. रेगे यांना शालेय शिक्षणासोबत चित्रकलेचा लळा लागला. ते दिवस होते ब्रिटिश विरोधी आंदोलनाचे. नकळतच डी. डी. रेगे यांच्या मनाच्या तळाशी देशप्रेमाचे, स्वातंत्र्यप्राप्तीचे विचार अगदी खोलवर झिरपले होते, त्यात भरीसभर म्हणून रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रदीर्घ सहवास त्यांना लाभला. साहजिकच डी. डी. रेगे यांच्या मनात क्रांतीची बीजं रोवली गेली. त्या ऊर्मीतच डी. डी. रेगे यांनी सैन्यदलात भरती होण्याचा निर्णय घेतला. एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे चित्रकलेची ओढ. मात्र मनाने कर्तव्याला श्रेष्ठ मानले आणि रेगे यांचा प्रवास युद्धभूमीकडे झाला.
यथावकाश युद्धभूमीवरून परतल्यावर डी. डी. रेगे यांनी आपल्या मूळ छंदाकडे अर्थात चित्रकलेकडे आपला मोर्चा वळवला. अल्पावधीतच चित्रकार डी. डी. रेगे म्हणून ते देशाविदेशात ख्यातकीर्त झाले. पहिली पत्नी सौ. यशवंती व द्वितीय पत्नी सौ. मालती यांच्यासोबत संसारसुखाची मार्गक्रमणा करणार्या. डी. डी. रेगे यांचे प्रापंचिक आयुष्य समृद्ध झाले ते कन्येच्या, चि. शिवदुर्गा हिच्या आगमनाने. नामांकित चित्रकार, छांदिष्ट अवलिया, तपस्वी संग्राहक म्हणून भरभरून यश मिळविणार्या डी. डी. रेगे यांचा कौटुंबिक प्रवासही समृद्ध व संपन्न झाला.
आघाडीचे चित्रकार म्हणून नावलौकिक संपादन करीत असतानाच डी. डी. रेगे यांनी कुंचल्यासोबत लेखणीचे आव्हान देखील स्वीकारले. १९३९ ते १९४५ या दरम्यान झालेल्या दुसर्यास महायुद्धात भाग घेणाऱ्या चित्रकार डी. डी. रेगे यांच्या हाती राष्ट्रकवी रविंद्रनाथ टागोर यांच्या नोबेल पारितोषिक विजेत्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहाची प्रत आली. विलक्षण झपाटल्यागत त्यांनी ती वाचून काढली. इतकंच नव्हे तर अधूनमधून मिळणारा वेळ त्यांनी 'गीतांजली'च्या काव्यवाचनात सत्कारणी लावला.
लहानपणापासून समर्थ श्रीरामदासांबद्दल अतीव प्रेम व आदर असल्याने चित्रकार डी. डी. रेगे यांच्या मनात "आपणांसी जे जे ठावे ते इतरांसीही सांगावे' अशी इच्छा दाटून आली आणि धुमश्र्चक्रीने व्यापलेल्या त्या समरांगणावर 'गीतांजली' या काव्याचा मराठी भावानुवाद त्यांच्या हातून साकारला गेला. या अनुवादाचे खुद्द रविंद्रनाथ टागोरांपासून महात्मा गांधींपर्यंत अनेक दिग्गजांनी अतिशय कौतुक केले.
गीतांजलीच्या भावोत्कट अनुवादानंतर चित्रकार डी. डी. रेगे यांच्या हातून कलावंतांची शब्दचित्रे, श्रीसद्गुरु नारायण महाराज (चरित्र), क्रिकेटवीरांच्या तीन पिढ्या, संतश्रेष्ठ गोविंद (चरित्र), पुणे व प्राचीन धार्मिकस्थाने, श्रीगोविंदविजय (पोथी), श्रीजंगली महाराज (संशोधन), संतप्रसाद भाग १ व २ तसेच चित्रे नियतीची (आत्मवृत्त) अशी लेखनसंपदा लिहून झाली. त्यासोबतच दै. सकाळ आणि दै. स्वराज्य यांसारख्या पुण्यातील प्रतिष्ठित वर्तमानपत्रातून त्यांनी केलेल्या सदर लेखनानेही एक काळ गाजविला.
चित्रकार म्हणून डी. डी. रेगे उभ्या महाराष्ट्राला सुपरिचित असले तरी त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे ते म्हणजे, संतवस्तू संग्रहालयाची उभारणी. चित्रकार डी. डी. रेगे यांनी महाराष्ट्राच्या अनेकविध भागातील अनेक प्रसिद्ध, अप्रसिद्ध संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील, नित्य हाताळलेल्या वस्तूंचे संग्रहालय करण्याचा ध्यास घेतला. या उपक्रमाची सुरुवात बेट केडगावच्या नारायण महाराजांमुळे झाली. बेट केडगाव येथे चित्रकार डी. डी. रेगे यांनी नारायण महाराजांचे भव्य पेंटिंग्ज करून दिले, त्यावेळी प्रसाद म्हणून नारायण महाराजांच्या नित्य वापरातील वस्तू (जरीची टोपी, कौपीन) चित्रकार डी. डी. रेगे यांना प्रसादभेट म्हणून दिल्या गेल्या. यांतूनच चित्रकार डी. डी. रेगे यांच्या मनांत संतवस्तूंचा संग्रह करण्याची ऊर्मी दाटून आली आणि एकामागोमाग एक अशा अनेक संतश्रेष्ठांच्या नित्य वापरातील वस्तूंचा संचय त्यांच्याकडे होत गेला. पाहता पाहता, चित्रकार डी डी. रेगे हे नाव पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने प्रकाशात आले.
श्रीस्वामी समर्थांच्या नित्य वापरातील रेशमी टोपी, श्रीगजानन महाराजांची चिलीम, ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकरांचे मृगाजीन (आसन) अशा विविध वस्तूंचा संचय होत गेला. पुढे मात्र हा ध्यास चित्रकार डी. डी. रेगे यांची चांगलीच परीक्षा पाहता झाला. संत साहित्य जमा करण्याच्या या अनोख्या छंदापायीच वाटेल तितका पैसा खर्च करून ते महाराष्ट्रातील कानाकोपर्याात फिरले. प्रसंगी पदराला खार लावून त्यांनी संतवस्तूंचा संग्रह करण्यास सुरुवात केली. कधी दैव अनुकूल झाले मात्र बरेचदा प्रतिकूल परिस्थितीशीही त्यांना या छंदासाठी अनेकदा सामना करावा लागला, झगडा द्यावा लागला. अनेक आघात, मनस्ताप, अवहेलना यांना सामोरे जावे लागले. आर्थिक कुचंबणा, ओढगस्तीचा संसार यातून मार्ग काढीत डी. डी. रेगे यांनी त्यांचा छंद निव्वळ जोपासलाच नाही तर वृद्धिंगत देखील केला. त्यांचा हा उपक्रम, आजही 'संतवैभवाची साक्ष' देत ठामपणे उभा आहे. डी. डी. रेगे यांचे २ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.
संकलित -
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment