गोकुळाष्टमी: भक्ती, आनंद आणि प्रेरणेचा उत्सव

कृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते, हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सावाप्रीत्यर्थ संपूर्ण भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला.

गोकुळाष्टमी: भक्ती, आनंद आणि प्रेरणेचा उत्सव मुख्य फोटो
मुख्य फोटो

कृष्ण जन्माष्टमी, ज्याला गोकुळाष्टमी असेही म्हटले जाते, हा सण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सावाप्रीत्यर्थ संपूर्ण भारतात आणि जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचा जन्म झाला.

श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत कंसाच्या बंदिवासात देवकी आणि वसुदेवाच्या पोटी झाला. असुरांचा संहार करून धर्माची स्थापना करण्यासाठी आणि मानवकल्याणासाठी श्रीकृष्णाने अवतार घेतला, अशी श्रद्धा आहे.या दिवशी भाविक दिवसभर उपवास करतात. रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मसोहळा साजरा केला जातो. बाळकृष्णाच्या मूर्तीला अभ्यंगस्नान घालून, नवीन वस्त्रे व अलंकारांनी सजवले जाते. त्याला पाळण्यात ठेवून अंगाई गीते आणि भजने गायली जातात. पोहे, लोणी, साखर, आणि पंचामृताचा नैवेद्य दाखवून महाआरती केली जाते.

• दहीहंडीचा जल्लोष जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी 'गोपाळकाला' किंवा 'दहीहंडी'चा सण साजरा होतो. बाळकृष्ण लहानपणी आपल्या गोपाळ मित्रांसोबत घरोघरी टांगलेली लोण्याची गाडगी फोडून लोणी खात असत. या बाललीलेची आठवण म्हणून दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.

रस्त्या-रस्त्यांवर उंच हंड्या बांधल्या जातात आणि गोविंदा पथके मानवी मनोरे (थर) रचून ही हंडी फोडण्यासाठी स्पर्धा करतात. 'गोविंदा आला रे आला' आणि 'गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा'च्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून जातो. • श्रीकृष्णाच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता

कृष्ण जन्माष्टमी हा केवळ पूजा-अर्चा करण्याचा सण नसून श्रीकृष्णाच्या जीवनमूल्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. महाभारतात अर्जुनाला दिलेला भगवद्गीतेचा संदेश आजही मानवाला मार्गदर्शक ठरतो: "कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन" (फळाची आशा न धरता सतत आपले कर्तव्य करत राहा.) श्रीकृष्णाने आपले संपूर्ण जीवन प्रेम, मुत्सद्दीपणा, न्याय आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी व्यतीत केले. त्यांची शिकवण माणसाला अडचणीच्या काळात धैर्याने उभे राहण्याची शक्ती देते. जन्माष्टमीचा हा सण आपल्याला आपापसातील भेदभाव विसरून एकत्र येण्याची, प्रेम आणि आनंदाची पेरणी करण्याची प्रेरणा देतो.

- संकलित

Publisher: Gouri M. Kulkarni News publisher name | Date: 02-09-2026 News publication date | Time: 05:54 PM News publication time | Views: 22 Number of times this news has been viewed | District: Sangli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement