श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव

अब्दीमंडी येथील श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिरात ४ व ५ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवानिमित्त भजन, महाभिषेक, मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव, दहीहंडी आणि तुलसी अर्चना असे विविध कार्यक्रम होणार आहेत. राधा-कृष्ण मंदिर, शिव-पार्वती-बालगणेशाचे तळघरातील मंदिर, विष्णू अवतारांची शिल्पे आणि नवग्रह दर्शन ही मंदिराची प्रमुख आकर्षणे आहेत.

श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव मुख्य फोटो
श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अब्दीमंडी येथील श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव आणि शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिराची वास्तुरचना ओडिशातील प्रसिद्ध जगन्नाथपुरी मंदिराच्या वास्तुशैलीवर आधारित आहे.

मंदिरातील खांबांवर सुंदर नक्षीकाम असून ते ओडिशातील कारागिरांनी केले असल्याची माहिती उपलब्ध आहे. मंदिराला तीन कळस असून मुख्य गाभाऱ्यावरील कळस जमिनीपासून सुमारे ५५ फूट, मध्यवर्ती कळस सुमारे ३५ फूट आणि सभामंडपावरील कळस सुमारे २५ फूट उंच आहे.

मंदिराच्या पहिल्या मजल्यावर मकराना पांढऱ्या संगमरवरातील राधा-कृष्णाच्या सुंदर मूर्ती विराजमान आहेत. मंदिराच्या तळघरात शिव-पार्वती व त्यांच्या मांडीवर बालगणेश असलेली संगमरवरी मूर्ती आहे. येथे शिवलिंगाऐवजी भगवान शिवाचे मूर्तीरूपात दर्शन होते.

याशिवाय मंदिर परिसरात भगवान विष्णूंच्या विविध अवतारांची शिल्परूप मांडणी तसेच नवग्रहांचे दर्शन घेता येते. त्यामुळे हे ठिकाण धार्मिक दर्शनासोबतच आध्यात्मिक पर्यटनाचे आकर्षण ठरत आहे.जन्माष्टमीच्या दिवशी विविध कार्यक्रम ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता देवमुद्रा ग्रुपतर्फे ‘श्रीकृष्ण लीला नृत्य प्रस्तुती’, रात्री ८ वाजता ‘श्रीकृष्ण भक्ती भजन जैमिंग’, रात्री १० वाजता महाभिषेक आणि रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव होणार आहे. भजन जैमिंगनंतर भाविकांना भंडारा महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

५ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता अभिषेक पूजन, सायंकाळी ६ वाजता ‘राधा के संग दही हंडी’ उत्सव आणि सायंकाळी ७ वाजता संगीतमय तुलसी अर्चना आयोजित करण्यात आली आहे.

मंदिराचा पत्ता श्री राधामुकुंद युगल सरकार मंदिर केसापुरी टांडा, अब्दीमंडी, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र – ४३१००२.

दौलताबाद–वेरूळ मार्गावर हे मंदिर मुख्य रस्त्यालगत असल्याने दौलताबाद किल्ला, वेरूळ लेणी आणि घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठीही हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ ठरते. संदर्भ -संकलित

Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 04-09-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 04-09-2026 News publication date | Time: 11:41 AM News publication time | Views: 48 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement