अमृत टीमची सदिच्छा भेट; कार्यासाठी सहकार्याची ग्वाही
अमृत टीमची सदिच्छा भेट; कार्यासाठी सहकार्याची ग्वाही
उदगीर : राष्ट्रीय कार्यसमिती सदस्य, भाजप युवा मोर्चा तसेच उत्तर प्रदेश सहप्रभारी सचिव, जन प्रतिष्ठान (NGO) मा. ॲड. विवेकानंद उजळंबकर यांनी उदगीर येथे अमृतच्या टीमची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. संस्थेच्या कार्याची माहिती घेतल्यानंतर अमृतच्या पुढील जनहितकारी कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची सकारात्मक भावना त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगी विश्व हिंदू परिषद सहसेवा प्रमुख व देवगिरी प्रांत मंत्री मा. श्री. संतोष कुलकर्णी, अमृतचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक श्री. सौरभ कुलकर्णी तसेच अमृत मित्र (उदगीर) श्री. प्रशांत कापसे उपस्थित होते. अमृतच्या जनहितकारी उपक्रमांना मिळणारे हे सहकार्य संस्थेच्या पुढील कार्याला निश्चितच बळ देणारे असून, समाजहिताचे कार्य अधिक व्यापक आणि प्रभावीपणे करण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment