अमृत संस्था, शाखा नांदेड व वै. धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'विश्वबंधुत्व पंधरवडा' संपन्न

अमृत संस्था व वै. धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'विश्वबंधुत्व पंधरवडा' संपन्न; अध्यात्म व विज्ञानाच्या समन्वयावर भर

अमृत संस्था, शाखा नांदेड व वै. धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'विश्वबंधुत्व पंधरवडा' संपन्न मुख्य फोटो
अमृत संस्था, शाखा नांदेड व वै. धुंडा महाराज महाविद्यालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमाने 'विश्वबंधुत्व पंधरवडा' संपन्न अतिरिक्त फोटो

अध्यात्मवाद व विज्ञानवाद यांच्या समन्वयातून विश्वबंधुत्वाची जोपासना, हे स्वामी विवेकानंदाचे उदात्त ध्येय - प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी मानवी जीवनाची यशस्वीता ही केवळ भौतिक, किंवा केवळ अध्यात्मिक प्रगती द्वारे होत नसते तर या दोन्हीच्या समन्वयातून अखिल मानव जातीचा विकास होतो. पाश्चात्त्यांचा भौतिकवाद व पौर्वात्यांचा (भारतीयांचा) अध्यात्मवाद यांच्या समन्वयातून विश्वबंधुत्वाची जोपासना करणे हे स्वामी विवेकानंदाचे उदात्त व व्यापक ध्येय होते, असे मत प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय आणि महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्था (अमृत संस्था) शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्वबंधुत्व पंधरवडा कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपप्रसंगी ते बोलत होते.

अमेरिकेतील शिकागो येथे संपन्न झालेल्या जागतिक धर्म संसदेत ११ सप्टेंबर १८९३ रोजी स्वामी विवेकानंदानी दिलेल्या मानवतेच्या संदेशाचे स्मरण करण्यासाठी ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जात आहे. कार्यक्रमात प्रथम स्वामी विवेकानंदाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. दिलीप भडके, प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र बेंबरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ. प्रकाश वारे, अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ माळहिप्परगेकर, उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी, नायगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे व्यवस्थापन समिती सदस्य लक्ष्मण बुद्धलवाड इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना प्राचार्य डॉ. विजय कुलकर्णी म्हणाले की, वसुधैव कुटुंबकम किंवा हे विश्वचि माझे घर, अशी भारतीय परंपरेची सहिष्णुतावादी व मानवतावादी शिकवण असून त्याचे विस्मरण होता कामा नये.

शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत सभ्य स्त्री पुरुष हो, अशा पारंपारिक शब्दांचा वापर न करता बंधूंनो आणि भगिनींनो या शब्दाचा उच्चार करून स्वामी विवेकानंदांनी परिषदेत उपस्थित सर्व मान्यवर व श्रोते वृंदांची मने जिंकून घेतली आणि उदात्त, व्यापक हिंदू तत्त्वज्ञानाची ओळख अखिल जगाला करून दिली, असे मत प्रमुख वक्ते डॉ. रवींद्र बेंबरे यांनी व्यक्त केले.

विश्वेश्वर जोशी यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश कथन करून अमृत संस्थेच्या विविध सामाजिक योजना व उपक्रमाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात सौरभ माळहिप्परगेकर यांनी अमृत युवा ऊर्जा संवाद या उपक्रमा अंतर्गत एक दिवस राष्ट्रासाठी या विषयावर महाविद्यालयीन तरुणाईशी (जेन झेड) संवाद साधला. या सत्रात प्रश्नोत्तररुपी संवादामध्ये विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व राष्ट्रीय समस्यांवर आपली मते व्यक्त करत आपले ध्येय प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश वारे यांनी केले तर आभार डॉ. दिलीप भडके यांनी मानले. या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 25-09-2026 News publication date | Time: 08:05 PM News publication time | Views: 18 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news
Publisher: विश्वेश्वर वासुदेवराव जोशी News publisher name | Date: 25-09-2026 News publication date | Time: 08:05 PM News publication time | Views: 18 Number of times this news has been viewed | District: Nanded Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement