जालन्यातील १४ विद्यार्थ्यांना टंकलेखन योजनेचा लाभ; संपूर्ण फीचा परतावा - अमृत महाराष्ट्र

जालन्यातील १४ विद्यार्थ्यांना टंकलेखन योजनेचा लाभ; संपूर्ण फीचा परतावा

अमृत संस्थेच्या योजनेमुळे गरजूंना उपलब्ध झाली शासकीय नोकरीची संधी

जालन्यातील १४ विद्यार्थ्यांना टंकलेखन योजनेचा लाभ; संपूर्ण फीचा परतावा मुख्य फोटो
जालन्यातील १४ विद्यार्थ्यांना टंकलेखन योजनेचा लाभ; संपूर्ण फीचा परतावा अतिरिक्त फोटो

जालना : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबवण्यात येतात. त्यांपैकी GCC-TBC अर्थात शासकीय टंकलेखन व लघुलेखन योजनेचा लाभ जालना जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांना मिळाला आहे. शासकीय सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केल्यानंतर लाभार्थ्यांना अमृत संस्थेकडून संपूर्ण अभ्यासक्रम शुल्काचा परतावा देण्यात आला आहे.

भार्गव आचार्य, शंतनू जोशी, शारदा कुलकर्णी, भाग्यश्री रेंधे, रेणुका कुलकर्णी, साक्षी रणनवरे, मानसी महेर, यशवंत पोखरकर, मयुरी पुजारी, विनय राठी, गौरी बंग, समीक्षा कुलकर्णी, श्रीनिवास देशमुख व जया देशमुख या विद्यार्थ्यांनी मराठी व इंग्रजी टंकलेखन (Mar-30, Mar-40, Eng-30, Eng-40, Eng-60, Eng-100) हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

शासकीय टंकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर या सर्व लाभार्थ्यांना अमृत संस्थेकडून संपूर्ण फीचा परतावा देण्यात आला आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. शासकीय टंकलेखक पदासाठी आवश्यक असलेली पात्रता मिळाल्याने विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

अमृत संस्थेच्या या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यातील गरजू व पात्र विद्यार्थ्यांना शासकीय क्षेत्रात करिअर घडवण्याची संधी मिळाली असून, युवकांमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढेही अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अशा उपयुक्त योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत जिल्हा कार्यालय,

दुसरा मजला, प्रशासकीय इमारत,

जिल्हाधिकारी कार्यालय, जालना.

मोबाइल : 7391065474

अमृत संस्थेविषयी :

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Nitin khekale News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 578 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news
Publisher: Nitin khekale News publisher name | Date: 10-01-2026 News publication date | Time: 11:21 AM News publication time | Views: 578 Number of times this news has been viewed | District: jalna Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement