गोंदियात मिळतोय चांगला प्रतिसाद
अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. लक्ष्यित गटातील युवक, तसेच महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही संस्था विविध उपक्रम राबवत आहे. गोंदिया हे आता उद्यमशीलतेचे नवे केंद्र बनले आहे. अमृत संस्थेने असे व्यासपीठ तयार केले आहे, की ज्यातून अनेक नवे उद्योजक घडत आहेत.
पहिल्या बॅचच्या यशामुळे युवकांमध्ये उत्साहाची लाट आहे. आता नव्या बॅचेस सुरू होणार आहेत, त्यामुळे सर्व इच्छुक विद्यार्थी व लाभार्थींनी आपली आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत आणि आपापल्या जिल्ह्यांतील अमृत संस्थेच्या कार्यालयाला भेट द्यावी. हे व्यासपीठ युवकांना बहुआयामी कौशल्ये देऊन आत्मनिर्भर बनवत आहे. अमृत संस्थेसोबत भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी खालील कोर्सेस उपलब्ध आहेत. अमृत संस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अनुभवी प्रशिक्षक व्यावहारिक व रोजगाराभिमुख मार्गदर्शन करतात. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील इच्छुकांना सहभागी होण्याची संधी असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग उपलब्ध होतो. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्र डिजिटल होत आहे. या पार्श्वभूमीवर अमृत संस्था युवकांना तांत्रिक कौशल्यांबरोबरच, उद्यमशीलता, नवोन्मेष आणि सामाजिक जबाबदारी यांचेही प्रशिक्षण देते.
उपलब्ध मोफत कोर्स
अमृत सूर्यमित्र - सौर पॅनेल स्थापनेचे तंत्रज्ञ
अमृत डिजिप्रेन्युअर
अमृत आरी वर्क (हस्तकला भरतकाम)
अमृत बेकरी (क्राफ्ट बेकर)
अमृत मोबाइल फिल्म मेकिंग
अमृत अॅनिमेशन
अमृत अनुपमा
अमृतपेठ - ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म
अमृत पर्यटन - पर्यटन सल्लागार
अमृत ग्लॅमर - व्यावसायिक मेकअप कलाकार
अमृत ई-रिपेअर मित्र
अमृत आयात-निर्यात
अमृत अलंकार
अमृत पत्रकार
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment