अमृत संस्थेच्या योजनेतून सिल्लोडच्या उद्योजकाला ४४ हजार ४७० रुपयांचा व्याजपरतावा - अमृत महाराष्ट्र

अमृत संस्थेच्या योजनेतून सिल्लोडच्या उद्योजकाला ४४ हजार ४७० रुपयांचा व्याजपरतावा

पात्र असलेल्या सर्वांनी व्यवसायवृद्धीसाठी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमृत संस्थेच्या योजनेतून सिल्लोडच्या उद्योजकाला ४४ हजार ४७० रुपयांचा व्याजपरतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

सिल्लोड (छत्रपती संभाजीनगर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येणारी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना लघु उद्योजकांसाठी लाभदायक ठरत आहे. या योजनेतून सिल्लोड तालुक्यातील एका उद्योजकाला आतापर्यंत ४४ हजार ४७० रुपयांचा व्याजपरतावा मिळाला आहे.

मंगेश खोंडे यांचे सिल्लोड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात व्यंकटेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स आहे. त्यांनी व्यवसाय विस्तारासाठी अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेअंतर्गत अर्ज केला होता. या प्रक्रियेसाठी अमृत संस्थेचेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे यांनी त्यांना आवश्यक माहिती व मार्गदर्शन केले. अर्जप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चिखली अर्बन बँकेच्या सिल्लोड शाखेतून खोंडे यांना १५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले. या कर्जाच्या साह्याने त्यांनी व्यवसाय अधिक सक्षमपणे सुरू ठेवला. कर्जाचे सर्व हप्ते ते वेळेवर व नियमितपणे भरत आहेत.

अमृत संस्थेच्या व्याजपरतावा योजनेसाठी त्यांचा अर्ज मंजूर झाल्यामुळे त्यांना आतापर्यंत ४४ हजार ४७० रुपयांचा व्याजपरतावा थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा झाला आहे. रक्कम जमा झाल्यानंतर त्यांनी अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. यानंतर त्यांनी योगेश रोडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेमुळे लघुउद्योजकांना मोठा आधार मिळत असल्याचे सांगून जिल्ह्यातील व तालुक्यातील उद्योजकांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन खोंडे यांनी केले.

अमृत संस्थेचा लक्ष्यित गट कोणता? 

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?

वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते.

अधिक माहितीसाठी संबंधित जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा अमृतचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्सना भेट द्यावी.

अक्षय चंद्रकांत लंबे - 7391065475

छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक, अमृत

योगेश भास्करराव रोडे - 9403200606

जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत

पत्ता : अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय,

पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको,

हनुमाननगर पाण्याच्या टाकीजवळ,

छत्रपती संभाजीनगर- ४३१००९

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: योगेश भास्करराव रोडे News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 535 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश भास्करराव रोडे News publisher name | Date: 19-01-2026 News publication date | Time: 11:22 AM News publication time | Views: 535 Number of times this news has been viewed | District: chhatrapati_sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement