संत एकनाथ महाराजांचा अभंग
जगामाजी कीर्ती एक श्रीराम ।
वाउगा तूं श्रम न करीं जना ।।१।।
सदा सर्वकाळ आठवी वेळोवेळां ।
मग सुखसोहळा काय उणें ।।२।।
येणें यातायाती चुकती संसार ।
भवभ्रम निर्धार दुरी ठाके ।।३।।
सांपडलें वर्म आम्हा इह जनीं ।
एका जनार्दनी नाम गाऊं ।।४।।
- संत एकनाथ महाराज
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment