समर्थ रामदासस्वामींचा अभंग
माझा कुलस्वामी कैलासीचा राजा ।
भक्तांचिया काजा पावतसे ।।१।।
पावतसे दश भुजा उचलुन ।
माझा पंचानन कैवारी ।।२।।
कैवारी देव व्याघ्राच्या स्वरुपें ।
कोपे भूमंडळ जाळू शके ।।३।।
जाळू शके सृष्टी उघडिता दृष्टी ।
तेथें कोण गोष्टी आणिकांची ।।४।।
आणिकांची महती शंकराखालती ।
वांचविली क्षिती दास म्हणें ।।५।।
- समर्थ रामदासस्वामी
(संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment