संत एकनाथ महाराज यांचा अभंग
आशाबद्ध करिती देवाचें पूजन ।
तेणें नारायण तुष्ट नोहे ।।१।।
आशाबद्ध करिती वेदाचें पठण ।
तेणें नारायण तुष्ट नोहे ।।२।।
आशाबद्ध करिती श्रवण मनन ।
तेणें नारायण तुष्ट नोहे ।।३।।
आशाबद्ध करिती दैवत उपासन ।
तेणें नारायण तुष्ट नोहे ।।४।।
आशाबद्ध करिती जपतप हवन ।
तेणें नारायण तुष्ट नोहे ।।५।।
निराशी करिती देवाचें कीर्तन ।
एका जनार्दनी तुष्ट होय ।।६।।
- संत एकनाथ महाराज (संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment