संत नामदेव महाराजांचा अभंग
भिऊनि रिघीजे समर्थाचे पोटीं ।
विषयाची तो भेटी नको मज ।।१।।
तैसा मी शरण आलोंसे केशवा ।
मज त्वां राखावें पायांतळीं ।।२।।
नको उदासीन राखों अभिमान ।
माझें आगमन विचारों कां ।।३।।
तुझेनि होईल तेंच मी मागेन ।
न सोडीं चरण अहर्निशीं ।।४।।
अविद्या अपार संचरली देवा ।
आम्हासि कुढावा नाहीं कोणी ।।५।।
देवा आतां मज नको गर्भवास ।
नामा विष्णुदास विनवीतसे ।।६।।
- संत नामदेव महाराज (संकलक : प्रसाद वैद्य, रत्नागिरी)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment