संत तुकाराम महाराजांचा अभंग
कीर्तनाच्या सुखें सुखी होय देव । पंढरीचा राव संगीं असें ।।१।। भक्त जाय सदा हरिकीर्ति गात । त्यासवें अनंत हिंडतसे ।।२।। त्रैलोक्य भ्रमण फिरत नारद । त्यासवें गोविंद फिरतसे ।।३।। नारद मंजूळ सुस्वरें गीत गाय । मार्गी चालताहे संगें हरि ।।४।। तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची । नाहीं आणिकांची प्रीति ऐसी ।।५।। - संत तुकाराम महाराज (संकलक : प्रसाद वैद्य)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment